शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामांसाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण होणार

By admin | Updated: August 7, 2014 22:57 IST

मजुरांचीही मदत घेणार : रोजगार सेवक नोंदविणार कामांची मागणी

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची मागणी नोंदविण्यासाठी आता राज्यभरात कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात ग्राम रोजगार सेवकांकडून कुटुंबनिहाय कामांची मागणी नोंदविण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २0१५-१६ चे लेबर बजेट तयार करताना, कामांची मागणी वास्तवावर आधारित असावी, यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत गत ४ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबांच्या प्रत्येक घराला भेट देऊन, कामाची मागणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, स्त्री कर्ता असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय्य योजनांतर्गत शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे.या सर्व प्रवर्गातील कुंटुंबांची रोहयो कामांसंदर्भांत मागणी नोंदविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ८ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ग्राम रोजगार सेवकांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात कुटुंबनिहाय कामांची मागणी रोजगार सेवकांकडून नोंदविली जाणार आहे. त्यामध्ये रोहयो अंतर्गत कुटुंबांचा जॉबकार्ड क्रमांक, कामाची मागणी, काम मागणीचे दिवस तसेच ज्यांची नोंदणी झाली नाही, अशा कुटुंबांना ह्यजॉब कार्डह्ण देण्याबाबतची माहिती नोंदविण्यात येणार आहे.ही माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये ठराव घेतल्यानंतर ही माहिती पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.लेबर बजेट त्याआधारेच तयार करण्यात येणार आहे.** २५0 कुटुंबांचे सर्वेक्षण करणार एक रोजगार सेवक!या सर्वेक्षणात एक ग्राम रोजगार सेवक २५0 कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहे. २५0 पेक्षा जास्त कुटुंबांची संख्या असल्यास, संबंधित ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत महिला बचत गटांचे प्रतिनिधी, ग्रामसभेने मान्यता दिलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी व जास्त दिवस काम करणार्‍या मजूर कुटुंबातील शिक्षित मजुरांचीही या सर्वेक्षणाच्या कामासाठी मदत घेण्यात येणार आहे.सर्वेक्षणात आधार क्रमांकही घेणार!रोहयो अंतर्गत कुटुंबनिहाय रोजगार सेवकांमार्फत होणार्‍या या सर्वेक्षणात कामांची मागणी, जॉबकार्ड क्रमांक, कामांचे दिवस यासोबतच कुटुंबनिहाय आधार क्रमांकाची माहितीदेखील घेण्यात येणार आहे. कुटुंबातील सदस्यांची नावे आणि आधार क्रमांकाबाबतची माहिती या सर्वेक्षणात नोंदविण्यात येणार आहे.