शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा लागला शोध

By admin | Updated: September 3, 2016 00:55 IST

वैज्ञानिक वडिलांच्या शोषणाला बळी पडलेल्या मुलींना आता महिला बाल सुधारगृहात जीवन जगावे लागणार आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरण : सेवानिवृत्त वैज्ञानिकाच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : वैज्ञानिक वडिलांच्या शोषणाला बळी पडलेल्या मुलींना आता महिला बाल सुधारगृहात जीवन जगावे लागणार आहे. दुसरीकडे १६ वर्षीय पीडित अल्पवयीन कुटुंबीयांचा शोध लागला आहे. ते अमरावती येथील रहिवासी आहेत. ते मिळाल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येईल. यादरम्यान न्यायालयाने शुक्रवारी डॉ. मकसूद अंसारीची पोलीस कोठडी ७ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. धंतोली पोलिसांनी डॉ. अंसारीला ३१ आॅगस्ट रोजी अटक केली होती. १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली होता. डॉ. अंसारी मागील आठ वर्षांपासून तिचे शोषण करीत होता. अकरा आणि आठ वर्षाच्या मुलींसोबतही तो लैंगिक शोषणाचा प्रयत्न करायचा. मोठ्या मुलीने आपल्या मैत्रिणीला आपबिती सांगितली. मैत्रिणीने तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने पोलिसांना सूचना दिली. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. डॉ. अंसारीने तिन्ही मुलींना लहानपणीच दत्तक घेतले होते. यात त्याच्या तत्कालीन पत्नीनेही मदत केली होती. दत्तक घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबीसुद्धा पूर्ण करण्यात आल्या नव्हत्या. तेव्हापासून या तिन्ही मुली त्याच्यासोबतच राहत होत्या. डॉ. अंसारी २००० साली सेवानिवृत्त झाले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील निवासी आहेत. नोकरीत लागल्यापासून ते येथेच स्थायिक झाले. त्यांनी तीन लग्न केले. तिन्ही पत्नींसोबत त्यांचा घटस्फोट झाला. ते मुलींसोबत भाड्याने राहत होते. त्यांच्या कुटुंबातील कुणीच त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही मुलींना महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. तिन्ही मुली शहरातील एका पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. या घटनेपासून त्यांचे शिक्षणही प्रभावित झाले आहे. पोलिसांनी पीडित व डॉ. अंसारी यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. सुरुवातीला डॉ. अंसारी मुलींबाबत काहीही सांगण्यास टाळाटाळ करीत होता.(प्रतिनिधी) वयोवृद्ध असल्याने पोलीस बळाचा वापर करण्यास मागे पुढे पाहत आहे. पोलिसांनी तपासाची दिशा बदलवित मोठ्या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लावला आहे. डॉ. अंसारी यांना चांगला पगार होता. त्याला ५२ हजार रुपये पेन्शन मिळते. निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पीएसआय वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.