शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब न्यायालयाला वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार

By admin | Updated: January 23, 2017 02:18 IST

कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : ‘लिव्ह इन’ प्रकरणात खुलासा राकेश घानोडे   नागपूर कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. कुटुंब न्यायालय कायदा-१९८४ मधील कलम ७(१)(स्पष्टीकरण ‘बी’) यात ही तरतूद असल्याचा खुलासा निर्णयात करण्यात आला आहे. २१ मार्च २०१२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने त्यांना व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार नसल्याचे कारण नमूद करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील प्राध्यापकाची याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध प्राध्यापकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी हे अपील अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला. तसेच, कुटुंब न्यायालयाला संबंधित प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यास सांगितले. प्रकरणातील वादग्रस्त जोडपे शार्दुल व कविता नागपूर येथील रहिवासी आहेत. शार्दुल ही कविताच्या आयुष्यात आलेली दुसरी व्यक्ती होय. कविताच्या लेखी बयानानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. परंतु, त्यांचा घटस्फोट झालेला नाही. शार्दुल व कविता एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर विवाह न करताच सोबत रहायला लागले. दरम्यान, शार्दुलपासून कविताला मुलगी झाली. काही महिन्यांनी त्यांच्यात खटके उडायला लागले. शार्दुल कवितापासून दूर राहायला लागला. शार्दुलला पती मानणाऱ्या कविताला हे खपले नाही. त्यामुळे ती शार्दुलच्या घरात बळजबरीने राहायला लागली. परिणामी शार्दुलने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करून कविता ही त्याची पत्नी नसल्याचे घोषित करण्याची विनंती केली होती तर, कविताने ती शार्दुलची अधिकृत पत्नी असल्याचे घोषित करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कुटुंब न्यायालयाला हे प्रकरण आता गुणवत्तेवर निकाली काढावे लागणार आहे.(प्रतिनिधी) दावे-प्रतिदावे शार्दुल व कविताने आपापली बाजू योग्य ठरविण्यासाठी विविध दावे केले आहेत. कविताचा पहिला पती जिवंत आहे. त्यामुळे ती कायद्यानुसार दुसऱ्या व्यक्तीची अधिकृत पत्नी होऊ शकत नाही असे शार्दुलचे म्हणणे आहे. कवितानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. तेव्हापासून तिचा पतीशी एकदाही संपर्क आला नाही. परिणामी कायद्यानुसार पहिले लग्न रद्द ठरते असा दावा तिने केला आहे.