शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुक अकाऊंट बनविणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

वाडी : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर संबंधित व्यक्तीच्या जवळच्या लोकांना पैशाची मागणी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय ...

वाडी : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर संबंधित व्यक्तीच्या जवळच्या लोकांना पैशाची मागणी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील पत्रकार सुरेश फलके यांचे फेसबुक अकाऊंट आहे. २७ मे रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सुरेश फलके यांच्या फोटोचा व नावाचा वापर करून व स्वत:चा मोबाईल नंबर टाकून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. यानंतर फलके यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून ज्यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली त्यांच्या व्हाॅट्सअ‍ॅवर माझी फॅमिली अडचणीत आहे. मित्राच्या आजारी मुलीला मदत करायची आहे. अत्यंत महत्त्वाचे काम आहे, असे असे मॅसेज पाठवून ८ हजार, १० हजार, १३ तर काहींना २० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर उद्या पैसे परत करतो, असाही मॅसेज पाठविला. हा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत असताना सुरेश फलके यांना त्यांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी फोन करून आपल्याला पैशाची गरज आहे का, याबाबत फोनवरून विचारणा केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी वाडी पोलिसात संबंधित अज्ञात इसमाच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. हा प्रकार मागील काही दिवसापासून अनेकांशी घडलेला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना शहानिशा करून किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधितांशी प्रत्यक्ष बोलून आर्थिक व्यवहार करावा. तसेच अशा मॅसेजला प्रतिसाद न देता याबाबत सक्रिय राहत कुणीही बळी न पडण्याचे आवाहन वाडीचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.