शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

कचरामुक्त शहरासाठी पुन्हा कनकवरच विश्वास

By admin | Updated: June 13, 2014 01:18 IST

कनक रिसोर्सेस कंपनीकडून खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा ठपका ठेवून पैसे वसुलण्याची शिफारस करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावून कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये,

मनपाची क्लीन चिट : कचरा उचलण्यासाठी महिन्याला देणार सव्वादोन कोटी नागपूर : कनक रिसोर्सेस कंपनीकडून खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा ठपका ठेवून पैसे वसुलण्याची शिफारस करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावून कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. असे असतानाही कचरामुक्त शहर योजना राबविण्यासाठी पुन्हा एकदा कनक रिसोर्सेसवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत कचरा उचलण्यासाठी महापालिका कनक रिसोर्सेसला महिन्याला सव्वादोन कोटी रुपये देणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेने एकप्रकारे कनक रिसोर्सेस कंपनीला क्लीन चिट दिली आहे.

शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००९ मध्ये कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आले होते. १० वर्षाचा करार असला तरी पाच वर्षांनी त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी कनक रिसोर्सेस कंपनीला कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. २७ कोटी याप्रमाणे पाच वर्षाकरिता १३५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान कंपनीने खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा खुलासा आॅडिटमध्ये झाला होता. ही रक्कम वसूल करण्याची शिफारस आॅडिटमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त श्याम वर्धने यांनी कंपनीला नोटीस बजावली होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्यासमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता.

मात्र, कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला असल्याने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. गुरुवारी पुन्हा तोच प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी प्रदान करीत एकप्रकारे प्रशासनाने कनक रिसोर्सेस कंपनीला क्लीन चिट दिली आहे. (प्रतिनिधी)