शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फरार न होणे निर्दोषत्वाचा पुरावा नाही

By admin | Updated: October 17, 2014 01:02 IST

गुन्हा घडल्यानंतर एखादा आरोपी फरार झाला नसेल, तर तो निर्दोष आहे किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग नव्हता हे सिद्ध होत नाही असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपीलावरील

हायकोर्टाचा निष्कर्ष : जन्मठेपविरुद्धचे अपील फेटाळलेराकेश घानोडे - नागपूर गुन्हा घडल्यानंतर एखादा आरोपी फरार झाला नसेल, तर तो निर्दोष आहे किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग नव्हता हे सिद्ध होत नाही असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपीलावरील निर्णयात नोंदविला आहे. एकसमान परिस्थितीत वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी प्रतिक्रिया असते असेही न्यायालयाने म्हटले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील हत्याप्रकरणात तीनपैकी दोन आरोपी घटनेनंतर फरार झाले होते, तर एक आरोपी गावातच हजर राहिला होता. यावरून त्या आरोपीचे बेगुन्हेगारीत्व स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद संबंधित वकिलाने (आरोपीच्या) केला होता. या मुद्यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे खुलासा केला. नारायण रायसिंग चव्हाण (५६) असे आरोपीचे नाव असून तो वाई हातोला येथील रहिवासी आहे. नारायण, त्याची दोन मुले रमेश व गजानन यांनी २ जुलै २००९ रोजी श्यामराव चव्हाणचा काठ्यांनी बेदम मारून खून केला होता. यानंतर रमेश व गजानन फरार झाले, तर नारायण गावातच हजर राहिला होता. श्यामराव हा आरोपी नारायणचा सख्खा भाऊ होता. घटनेच्या दिवशी श्यामरावने नारायणच्या कुत्र्याला धक्का दिला होता. या कारणावरून आरोपींनी श्यामरावची हत्या केली. आरोपींनी श्यामरावची मुले मोहिनी व सूरज यांनाही मध्ये पडल्यामुळे मारहाण केली होती. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फरार आरोपींना अटक करण्यात अपयश आल्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर एकट्या नारायणविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यवतमाळ सत्र न्यायालयाने १४ डिसेंबर २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड, कलम ४५० (गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, तर कलम ३२४ (घातक शस्त्राने जखमी करणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी सरकारी पक्षाने संशयाशिवाय गुन्हा सिद्ध केल्याचे मत नोंदवून आरोपीचे अपील फेटाळून लावले व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. (प्रतिनिधी)