शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

एलईडी पथदिवे लावण्यात अपयश

By admin | Updated: December 29, 2016 02:46 IST

नागपूर शहरातील विविध मार्गांवर १८ महिन्यांत २७ हजार एलईडी पथदिवे लावण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता.

कंत्राट रद्द : १८ महिन्यांत लावले फक्त ५७७ पथदिवे नागपूर : नागपूर शहरातील विविध मार्गांवर १८ महिन्यांत २७ हजार एलईडी पथदिवे लावण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यानुसार मे. जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला कंत्राट देण्यात आला होता. परंतु या कंपनीला फक्त ५७७ पथदिवे लावता आल्याने हा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. एलईडी पथदिवे लावण्यासोबतच या कंपनीवर नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेले खांब हटविणे, नवीन खांब उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु काम समाधानकारक नसल्याने कंपनीला १० जुलै २०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्धारित १८ महिन्यांच्या कालावधीत २७ हजार पथदिवे लावण्यात यश आले असते तर ९.१६ कोटींची वीज बचत झाली असती. यातील १० टक्के रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार होती. परंतु कंपनीला यात यश आले नाही. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली. आता झोनस्तरावर एलईडी पथदिवे लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.(प्रतिनिधी) झोनस्तरावर देखभाल व दुरुस्ती शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुुरुस्तीचे कंत्राट आजवर केंद्रीयस्तरावर दिले जात होते. परंतु आता हे काम झोनस्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंत्राटदाराला एलईडी दिवे लावणे, बंद पथदिव्यांची दुरुस्ती, खांब बदलणे आदी कामे करावयाची आहेत. कंत्राट अधिक रकमेचा असला तरी यातून महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली.