शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 05:58 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे.

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना घ्यायचे का, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.गणेशपूजनानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी गडकरी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर गडकरी म्हणाले, माझ्याकडे भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालय आहे. या विभागांमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. या दोन मंत्रालयात बरीच आव्हाने आहेत. बरेच काम करणे बाकी आहे. रेल्वे मंत्रालय माझ्याकडे सोपविणार असल्याच्या बातम्या मी सध्या प्रसारमाध्यमांतून वाचत आहे. अमेरिकेत एक इन्फ्रास्ट्रक्चर विभाग आहे. त्याअंतर्गत रेल्वे, नागरी उड्डयण, जल व रस्ते वाहतूक हे सर्व परिवहन विभाग येतात. काही देशांमध्ये ही व्यवस्था वेगवेगळी आहे. कुणाकडे कोणते मंत्रालय द्यायचे, कोणते विभाग एकत्र करायचे हा पूर्ण अधिकार पंतप्रधानांचा आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.देशाला सुखशांती लाभोगडकरी यांनी आपल्या कुटुंबीयांसह घरी गणरायाची स्थापना केली. विधिवत पूजा केली. गणरायाने देशातील प्रत्येकाला सुख शांती प्रदान करावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. गडकरी म्हणाले, श्रीगणेश हे विद्येचे दैवत आहे. येत्या काळात ज्ञान, विज्ञानाचा उपयोग करून देशाने प्रगती करावी. भीती, अवर्षण, भ्रष्टाचारातून देश मुक्त होवो व ज्ञानाचा वापर करून भारताचे नवनिर्माण होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGaneshotsavगणेशोत्सव