शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोहक सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

By admin | Updated: August 29, 2014 01:07 IST

आंतरराष्ट्रीय नृत्यांचे सादरीकरण. उत्साहाला आलेले उधाण. टाळ्यांच्या कडकडाटाची दाद आणि अख्खे सभागृहच उत्सवात सहभागी करून घेताना राबविलेली अनोखी संकल्पना खास वातावरणनिर्मिती साधणारी.

सेंट झेव्हिअर्सच्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यास प्रारंभ : पाच देशातील विद्यार्थ्यांचा सहभागनागपूर : आंतरराष्ट्रीय नृत्यांचे सादरीकरण. उत्साहाला आलेले उधाण. टाळ्यांच्या कडकडाटाची दाद आणि अख्खे सभागृहच उत्सवात सहभागी करून घेताना राबविलेली अनोखी संकल्पना खास वातावरणनिर्मिती साधणारी. त्यात झिम्बाम्ब्वे, तर्की आदी देशातील लोकनृत्यात पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोहक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सेंट झेव्हिअर हायस्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कला व सांस्कृतिक सोहळ्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी महापौर अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा हा पहिला दिवस होता. ‘ब्रायटर टुमॉरो’ ही डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगातील पाच निरनिराळ्या देशांतील संस्कृती व कलाविष्काराचा संगम व्हावा हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे. या सोहळ्यात तर्की, झिम्बाब्वे, मोरोक्को, नायजेरिया व भारतातील एकूण २३०० विद्यार्थी व कलावंत सहभागी झाले आहेत. उद्घाटनानंतर लगेच सोहळ्याला सुरुवात झाली. आकर्षक रंगसंगतींसह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांमुळे नृत्याची अनोख्या रंगांची उधळण झाली. पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यात नागपूर गीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या ‘रॉक बॅन्ड’ तसेच चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालगीतांवरील नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. विदेशातील प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गेल्या ३ आठवड्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. याप्रसंगी लहान मुलांनी ‘नन्हा मुन्ना राही हू...’या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. झिम्बाव्वेच्या दोन मुलींनी यावेळी रसिक आणि विद्यार्थ्यांशी छोटेखानी संवाद साधला. भारताची संस्कृती आपल्याला खूप आवडल्याचे तसेच हिंदी भाषा शिकण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. काही हिंदी शब्द ज्यात ‘शुक्रिया, नमस्ते’ आदी त्यांनी म्हणून दाखविले. एका मुलीने तर नागपुरात येऊन मराठीत एक वाक्य शिकल्याचे सांगितले. ते वाक्य कुठले, असे विचारले असता तिने तिच्या शैलीत ‘आता माझी सटकली’ हे वाक्य म्हणून दाखविले आणि सभागृहात हंशा पिकला. याप्रसंगी उंचच उंच जिराफाची मान, फुलपाखरांच्या भव्य प्रतिकृती नृत्यात उपयोगात आणण्यात आल्या. सभागृहात प्रेक्षकांमध्येही या प्रतिकृतींसह नृत्य करण्यात आल्याने हा अनुभव उपस्थितांना आनंद देणारा होता. शुक्रवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)