शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंडशिप, लव्ह मॅरेज अन्‌....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या सलग संपर्कात राहू लागले. नंतर त्यांनी प्रेमविवाह केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या सलग संपर्कात राहू लागले. नंतर त्यांनी प्रेमविवाह केला आणि आता त्याने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून बलात्कार केला, अशी तक्रार तिने पोलिसांकडे नोंदविली. हे अजबगजब प्रकरण जरीपटक्यातील आहे.

मोहम्मद इर्शाद इकबाल मिर्झा (वय ३३), असे या प्रकरणात आरोपी ठरलेल्याचे नाव आहे. तो मेकोसाबाग ख्रिश्चन कॉलनीत राहतो. तक्रार करणारी महिला ३१ वर्षांची आहे. तिची आणि रेल्वेत नोकरी करणाऱ्या इर्शादची ओळख फेसबुकवर दोन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून ते सलग संपर्कात होते. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांनी नंतर प्रेमविवाह केला. तिला गर्भधारणाही झाली. नंतर मात्र त्यांच्या प्रेमाचा कैफ उतरला. दोघे भांडू लागले. त्यांच्यातील वाद वाढतच गेला. त्यांच्यात समेट व्हावा म्हणून दोघांच्याही नातेवाइकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा समेट झाला नाही. आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिली. अखेर ती शुक्रवारी जरीपटका ठाण्यात पोहोचली.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत तिने म्हटले की,

‘९ सप्टेंबर २०१९ ला इर्शादने घरी बोलावले आणि कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने बलात्कार केला. त्याचवेळी अश्लील फोटो, तसेच व्हिडिओ क्लिप तयार करून त्या व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन वर्षांपासून तो वारंवार बलात्कार करीत होता. गर्भधारणा झाल्यानंतर तो तिला गर्भ पाडण्याची धमकी देत होता’, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. तिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी इर्शादविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.