शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या शिक्षेत प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:10 IST

दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देतत्कालीन तपास अधिकारी ललित बोरा : परिस्थितीजन्य पुरावे केले होते गोळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.काळवीट शिकारप्रकरणी पुरावे गोळा करण्यात त्यावेळच्या तपास चमूची मौलिक भूमिका होती. आम्ही प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली होती. शिवाय शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा ड्रायव्हर, त्याचा मालक यांची साक्षदेखील घेतली होती; सोबतच इतर परिस्थितीजन्य पुरावेदेखील गोळा करण्यात आले होते. या प्रकरणात रायफल, रिव्हॉल्व्हर, एअरगनदेखील जप्त करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयात प्रकरण उभे झाले होते. आम्ही तपास करून तो न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर सरकारी पक्षानेदेखील सक्षमपणे युक्तिवाद केला. सलमान खान व इतर अभिनेत्यांवर दोषारोप होते. परंतु प्रत्यक्षदर्शींनी केवळ सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. इतरांनी केवळ त्याला उकसविले होते, असे ललित बोरा यांनी सांगितले.बिष्णोई समाज पर्यावरणप्रेमीकाळवीट शिकारीचे प्रकरण लावून धरण्यात बिष्णोई समाजाची मोठी भूमिका होती. याबाबत ललित बोरा यांना विचारणा केली असता हा समाज काळवीटसोबत भावनात्मक व सामाजिकदृष्ट्या जुळला असल्याचे त्यांनी सांगितले. जर बिष्णोई समाजाची परंपरा व इतिहास पाहिला तर ते २९ आदर्शांचे पालन करतात. यात झाडे न तोडणे तसेच जनावरांची हत्या न करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एखाद्या बछड्या काळविटाची आई मृत्यूमुखी पडली तर चक्क महिलांनी त्या बछड्याला स्तनपान केल्याचीदेखील उदाहरणे आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Salman Khanसलमान खानCourtन्यायालय