शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नागपुरात निवासी भागातील जमिनीवर हॉस्पिटल उभारणाऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:43 IST

Nagpur News Hospitals काँग्रेस नगर, वर्धा रोड, सेंट्रल बाजार रोड आदी परिसरावर हॉस्पिटल सुरू करणाऱ्यांची नजर आहे. हॉस्टिपलसाठी संबंधित भागात जमिनीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास नागरिकांना परिसरातून फिरणेही कठीण होईल.

ठळक मुद्देशहरातील खासगी हॉस्पिटल -६५० धंतोली, रामदासपेठ -३००-३२५ खासगी लॅब- ५० ते ६० रुग्ण व नातेवाईकांची गर्दी- १५ ते २० हजारधंतोली, रामदासपेठ लगतच्या भागात खरेदी-विक्री वाढली

राजीव सिंह/ गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ५०टक्के खासगी हॉस्पिटल धंतोली व रामदासपेठ परिसरात आहेत. परंतु हा निवासी भाग असल्याने येथे हजारोंच्या संख्येने येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पार्किंग, जैविक कचरा यासह अन्य मुद्यावरून प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले. मनपा सभागृहातही संबंधित भागात नवीन हॉस्पिटलला मंजुरी न देण्यावर सहमती झाली. परंतु आता या परिसरालगतच्या काँग्रेस नगर, वर्धा रोड, सेंट्रल बाजार रोड आदी परिसरावर हॉस्पिटल सुरू करणाऱ्यांची नजर आहे. हॉस्टिपलसाठी संबंधित भागात जमिनीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास नागरिकांना परिसरातून फिरणेही कठीण होईल.नागपूर शहरात लहान मोठे सुमारे ६५० खासगी रुग्णालये आहेत. यातील जवळपास ३०० हॉस्पिटल, क्लिनिक, नर्सिंग होम रामदासपेठ परिसरात आहेत. आता या परिसरात नवीन हॉस्पिटलला परवानगी देण्याला बंदी घातली आहे. या परिसरात ५०ते ६०लॅब आहेत. येथे सर्व प्रकारची तपासणी केली जाते. कोविड काळात तर काही खासगी लॅबमध्ये लांब रांगा लागत होत्या. या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातून संक्रमण पसरण्याचा कायम धोका असतो.सूत्रांच्या माहितीनुसार धंतोली, रामदासपेठ लगतचा भाग, वर्धा रोडवर हॉस्पिटल उभारण्याची इच्छा असलेल्यांनी अर्धा डझनहून अधिक मोठ्या जमिनीचे व्यवहार केले आहेत. यामुळे भविष्यात या भागात निश्चितच हॉस्पिटलची संख्या वाढणार आहे.नियम काय म्हणतातमनपाच्या नगररचना विभागाच्या कायद्यानुसार १५ मीटर रुंदीच्या रोडवर हॉस्पिटल उभारण्याला परवानगी दिली जाते. ९ मीटरचा रस्ता, जुने प्लॉटवर नर्सिंग, रुग्णालये, सुरू करू शकतात. वर्धा रोड २० मीटर रुंदीचा आहे. अशा परिस्थितीत या मार्गावर हॉस्पिटल उभारणाऱ्यांत जमीन खरेदीसाठी स्पर्धा सुरू आहे. संबंधित भागातील नागरिकांसाठी ही बाब निश्चितच चिंताजक आहे.ऑरेंज सिटी स्ट्रीटचा पर्यायमनपाचा ऑरेंज सिटी स्ट्रीट आर्थिक तंगीमुळे रखडला आहे. या स्ट्रीटवर डॉक्टरांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु बहुसंख्य डॉक्टर धंतोली, रामदासपेठ परिसर सोडण्याला तयार नाही. वास्तविक संबंधित भागात आता हॉस्पिटलची अजिबात गरज नाही. नागिरकांना होणारा त्रास विचारात घेता संबंधित भागाच्या एक किलोमीटर परिसरात कोणत्याही नवीन हॉस्पिटलला मंजुरी देता कामा नये.कोणताही अर्ज आलेला नाही : गावंडेधंतोली, रामदासपेठ भागात हॉस्पिटलला मंजुरी दिली जात नाही. या लगतच्या भागात नवीन हॉस्पिटलला डीसीआर अंतर्गत मंजुरी दिली जाऊ शकते. परंतु धंतोली, रामदासपेठ लगतच्या भागात नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी मंजुरीकरिता तूर्त कोणत्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. वर्धा रोडवरील काही अर्ज आले आहेत. नियमानुसार मंजुरी दिली जाईल. अशी माहिती मनपाच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांनी दिली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल