शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा बोजा!

By admin | Updated: May 7, 2014 03:01 IST

वीज ग्राहक अगोदरच वीज दरवाढीमुळे त्रस्त झाला असताना, महावितरणने आता अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा पुन्हा बोजा लादला आहे.

ग्राहकांचे बजेट बिघडले : एकाच महिन्यात दोन बिलनागपूर : वीज ग्राहक अगोदरच वीज दरवाढीमुळे त्रस्त झाला असताना, महावितरणने आता अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा पुन्हा बोजा लादला आहे. महावितरणने या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली वीज ग्राहकांना या महिन्याला दोन बिल पाठविले आहेत. यात एक एप्रिल महिन्याचे बिल असून, त्यासोबतच दुसरे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल देण्यात आले आहे. त्यानुसार वीज ग्राहकांना या महिन्याला दोन बिले भरावी लागणार आहे.महावितरणच्या मते, राज्य वीज नियामक आयोगाने गत २00५ मध्ये जारी केलेले परिपत्रक व भारतीय वीज कायदा २00३ च्या कलम ४७ अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. ती सुरक्षा ठेव आर्थिक वर्षातील कोणत्याही एका महिन्याच्या सरासरी वीज बिलाइतकी असेल. याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने त्याचे पुनर्निर्धारण करू शकते.एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी बिलापेक्षा कमी असेल, तर संबंधित ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. शिवाय वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीज दर आणि वीज वापर यामुळे वीज बिलांची रक्कम वाढली आहे. त्यामुळे त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल जमा करणे बंधनकारक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आयोगाने वीज ग्राहकांकडून जमा करण्यात येणार्‍या या सुरक्षा ठेवींवर कालावधीनुसार ९.५ टक्क्यापर्यंत व्याज देण्याचे निर्देश दिले आहेत.परंतु या निर्देशांचे महावितरण किती पालन करणार आणि किती ग्राहकांना व्याजाची रक्कम परत मिळणार, हे महावितरणलाच माहीत. (प्रतिनिधी)