शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यविस्तारासाठी बोलीभाषेच्या संवर्धनावर संघाचा राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:08 IST

देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअ.भा.प्रतिनिधी सभेत प्रस्तावभाषेच्या माध्यमातून होणार संघविस्तारदेशातील ९५ टक्के जिल्ह्यांत संघकार्य यावेळी डॉ.कृष्णगोपाल यांनी देशातील ९५ टक्के जिल्ह्यांमध्ये संघकार्य पोहोचल्याचे सांगितले. नागालँड, मिझोरम व काश्मीरचा काही भाग सोडला तर सगळीकडे संघाचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. लुप्त होत चाललेल्या बोली भाषांच्या संवर्धनासाठी संघ पुढाकार घेणार असून यासंदर्भात देशपातळीवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारपासून नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदीर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार झाली. या सभेत यासंदर्भातील प्रस्तावावर मंथन होणार आहे.सभा सुरु होण्याअगोदर संघाचे सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल यांनी पत्रपरिषदेत सभेबाबत माहिती दिली. यंदा सभेत केवळ एकच प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून संघ सामाजिक समरसतेवर कार्य करत आहे. त्याहून पुढे जात आता बोली-भाषा संवर्धनावर काम करण्यात येणार आहे. देशात वेगवेगळ््या बोलीभाषा प्रचलित आहेत. आदिवासी, दुर्गम भागातील तर अनेक बोली लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिकांकडूनदेखील या भाषांचा उपयोग कमी प्रमाणात होत आहे. परंतु या बोली व भाषांमध्ये आपल्या देशातील मोठी परंपरा व संस्कृती सामावलेली आहे. जर या भाषा टिकल्या तरच परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर स्वयंसेवक समाजात जाऊन बोलीभाषेच्या संवर्ध़नासाठी कार्य करतील, असे डॉ.कृष्णगोपाल यांनी सांगितले. यावेळी मंचावर अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य व अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते.प्रतिनिधी सभेत २५ महिलासंघाकडून महिलांना स्थान देण्यात येत नाही, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत महिलादेखील उपस्थित आहेत. या सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १ हजार ५३८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात २४ महिलांचादेखील समावेश आहे. सभेदरम्यान विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडणार आहेत.वर्षभरात संघशाखांत १८०० ने वाढमार्च २०१८ मध्ये संघाच्या देशभरात ३७, १९० स्थानांवर ५८ हजार ९६७ शाखा आहेत. मार्च २०१७ मध्ये हीच संख्या ५७ हजार १६५ इतकी होती. गेल्या वर्षभरात संघशाखांमध्ये १ हजार ८०२ ने वाढ झाली आहे. याशिवाय देशात १६ हजार ४०५ ठिकाणी संघाचे साप्ताहिक मिलन व ७ हजार ९७९ ठिकाणी संघ मंडळी चालतात.नाशिक शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दायावेळी डॉ.कृष्णगोपाल यांना नाशिकच्या शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर काढलेल्या मोर्चासंदर्भात विचारणा करण्यात आली. नाशिक येथील शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दा आहे. परंतु शेतकरी समृद्ध झाले पाहिजेत व विचारांनी मजबूत झाले पाहिजेत, ही संघाची भूमिका आहे. त्यादृष्टीने कार्यदेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ