शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यास मुदतवाढ : मार्च व एप्रिल महिन्यासाठी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 00:28 IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरीडिंग नसल्यास पाठवणार सरासरी बिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत. आता मार्च महिन्याचे वीज बिल १५ मेपर्यंत आणि एप्रिल महिन्याचे वीज बिल ३१ मेपर्यंत भरता येईल. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार तीन महिने रद्द करण्याच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांना हा दुसरा दिलासा देण्यात आला, हे विशेष.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे; सोबतच वीज बिलाची छपाई व वितरणदेखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीज बिल भरणा केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे वीज बिल भरण्याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. परंतु महावितरणने अगोदरच हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत रीडिंग होत नाही, तोपर्यंत सरासरी वीज बिल पाठवले जातील. रीडिंग सुरू झाल्यावर त्याचे समायोजन करून ते बिल ग्राहकांना पाठवले जातील.ग्राहकांनी स्वत: मीटरचे रीडिंग पाठवामहावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत: रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अपलोड करावेत, यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीज बिल प्राप्त होईल. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे, असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे. अशा नागरिकांनी अचूक वीज बिल भरावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल