शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या उत्पादकांना वार्षिक परतावा भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:47 IST

अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ मेपूर्वी वार्षिक परतावा (डी-१) व दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना अर्ध वार्षिक परतावा (डी-२) सादर करणे बंधनकारक आहे. पण, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्नपदार्थ उत्पादकांना वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्यासाठी ११ एप्रिल २०२० च्या परिपत्रकाद्वारे दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.

ठळक मुद्देअन्न व औषधी प्रशासन विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ मेपूर्वी वार्षिक परतावा (डी-१) व दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना अर्ध वार्षिक परतावा (डी-२) सादर करणे बंधनकारक आहे. पण, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्नपदार्थ उत्पादकांना वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्यासाठी ११ एप्रिल २०२० च्या परिपत्रकाद्वारे दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.त्यामुळे सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ जुलैपूर्वी वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करता येईल. अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ जुलैपर्यंत दंड आकारण्यात येणार नाही. यानंतर वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करणाऱ्या सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल, अशी कायद्यात तरतूद आहे.मिठाईच्या उत्पादनावर व खुल्या स्वरूपात विक्रीबाबत उत्पादन तिथी व वापरण्याची अंतिम तारीख नमूद करणे १ जून २०२० पासून बंधनकारक केले होते. त्यातही अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ३१ जुलैपूर्वी अन्नपदार्थ उत्पादकांनी वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्याचे तसेच मिठाई उत्पादकांनी मिठाईच्या उत्पादनावर व खुल्या स्वरूपात विक्रीबाबत, उत्पादन तिथी व पदार्थ वापरण्याची अंतिम तिथी १ आॅगस्टपासून नमूद करण्याचे आवाहन नागपूर विभागाच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग