शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकदेखील जारी केले आहे.

‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता, विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमामध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स अ‍ॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट) यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे होते व २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.

मात्र अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ होणे, मोबाईल अगोदरच ‘रजिस्टर’ झाला आहे, असे लिहून येणे, असे विद्यार्थ्यांना संदेश आले. तर काही विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राच्या गुणपत्रिका अवैध असल्याचे दाखविल्या गेले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून करण्यात आली. अखेर विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.

आता १६ जानेवारीपासून वर्ग

नियोजित वेळापत्रकानुसार १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात होणार होती. परंतु विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जारी केले असून, त्यानुसार १६ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, तर २९ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज दाखल करणे- १९ डिसेंबरपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी- २५ डिसेंबर

आक्षेप- २६ ते २८ डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी- २९ डिसेंबर (३ वाजता)

पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम - ३० ते ३१ डिसेंबर

जागांची वाटप यादी -३ जानेवारी

महाविद्यालयात रिपोर्टिंग -४ ते ८ जानेवारी

पहिल्या यादीतील रिक्त जागा-८ जानेवारी

दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम -८ ते १० जानेवारी

जागांची वाटप यादी - १२ जानेवारी

महाविद्यालयात रिपोर्टिंग - १३ ते १५ जानेवारी २०२१

शैक्षणिक वर्गांना सुरुवात - १६ जानेवारी २०२१