शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आर्थिक वर्ष तीन महिन्यांनी वाढल्याने करभरणा तारखेला मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:09 IST

कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च महिन्यात व्यापारी/ उद्योजक व कंपन्यांना भरावा लागणारा कर भरणा/विवरणपत्रे (रिटर्न्स) यांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. यावर निर्णय लवकरच होईल, अशी माहिती प्रत्यक्ष कर मंडळ व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळातील सूत्रांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देकर मंडळ अधिकाऱ्यांची माहितीअडचणीतील लॉकडाऊ नमुळे व्यापारी आणि उद्योजकांना मिळेल दिलासा

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च महिन्यात व्यापारी/ उद्योजक व कंपन्यांना भरावा लागणारा कर भरणा/विवरणपत्रे (रिटर्न्स) यांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. यावर निर्णय लवकरच होईल, अशी माहिती प्रत्यक्ष कर मंडळ व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळातील सूत्रांनी लोकमतला दिली.महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पंजाब आदी राज्यांनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्व बाजारपेठा व उद्योग प्रकल्प बंद झाले आहेत. मार्चमध्येच ही परिस्थिती उद्भवल्याने व्यापारी, उद्योजक व कंपन्या प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२० रोजी संपणारे २०१९-२० हे आर्थिक वर्ष १५ महिन्यांचे म्हणजेच जून २0२0 पर्यंत करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलाच आहे. त्यामुळे करभरणा करायलाही मुदतवाढ मिळेल, अशी शक्यता दिसू लागली आहे. तशी मागणी इन्कम टॅक्स गॅझेटेड आॅफिसर्स असोसिएशनने व फेडरेशन आॅफ इन्कम टॅक्स आॅफिसर्स असोसिएशनने केली होती. रिझर्व्ह बँकेनेच आता आर्थिक वर्ष १५ महिन्यांचे करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष अतुल गुप्ता म्हणाले की, प्राप्तिकर विभाग, व्यापारी व कंपन्यांची सॉफ्टवेअर्स १२ महिन्यांसाठी आहेत, ती सर्व बदलावी लागतील. मार्चमध्ये येणाºया करभरणा व विवरणपत्रांच्या तारखा वाढविणे हीच बहुसंख्या व्यापारी व उद्योजकांची मागणी आहे. याबाबतीत आयसीएआयने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर मंडळे, रिझर्व्ह बँक, सेबी व अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी केली आहे.आर्थिक वर्षाचे महिने वाढवल्यास आणि सध्या शेअर बाजार पडलेला असताना बाजारमूल्य कमी झालेल्या मोठ्या कंपन्यांना त्याचा गैरफायदा घेतील, अशी भीती या निर्णयाआधी नागपुरातील एक ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत केळकर यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार मोदी व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही.परंतु या दोन्ही मंडळांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सध्या मोदी व अजितकुमार यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत याच मुद्यावर बैठका सुरू होत्या. त्यानंतर २0१९/२0 हे आर्थिक वर्ष ३0 जूनपर्यंत नेण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :GSTजीएसटी