शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातदारांची पसंती मिहानला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे देशातील निर्यातदारांची पहिली पसंती मिहानला राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विमानतळाच्या परिसरातील कार्गो इमारतीमध्ये यूएस एन्टरप्राईजेस या जागतिक लॉजिस्टिक कंपनीतर्फे निर्यातदारांसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, मिहानमध्ये रामदेवबाबा यांच्या फळप्रक्रिया उद्योगासोबतच इतरही उद्योगांनी येथे उद्योग सुरू करण्यासंबंधी मागणी केली आहे. फळप्रक्रिया उद्योगाच्या निर्यातीसाठी शीतगृह साखळीची मागणी लक्षात घेऊन ही सुविधा केली आहे.शीतगृहाची क्षमता आठ टनदोन शीतगृहांची एकूण क्षमता आठ टन असून यूएस एन्टरप्राईजेसने १६ लाखांच्या गुंतवणुकीतून उभारणी केली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय निर्यातीत औषधी, फ्रोझन फूड, भाजीपाला, आईस्क्रीम, मटर आदी माल ठेवण्यात येणार आहे. यूएस एन्टरप्राईजेसला हे काम निविदेद्वारे पाच वर्षांसाठी मिळाले असून, कंपनीला दर महिना ३० हजार रुपये भाडे (वीज बिल वगळता) आणि नफ्यातून ३३ टक्के रक्कम मिहान इंडिया लिमिटेडला द्यायची आहे.