शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘इंटरसिटी’मध्ये बॉम्बस्फोटाची अफवा!

By admin | Updated: October 2, 2016 03:12 IST

अजनी यार्डात इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना समजली आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.

मॉक ड्रील : रेल्वे प्रशासनाने दाखविली तत्परतानागपूर : अजनी यार्डात इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना समजली आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. लगेच रेल्वेचे सर्व अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच मदतीसाठी भारत स्काऊट, गाईडचे विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. परंतु ही खरोखरची घटना नसून ‘मॉक ड्रील’ असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरक्षा आणि वेळेचे पालन हा भारतीय रेल्वेचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे रेल्वेचे अपघात कमी व्हावेत हा प्रयत्न नेहमीच करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा एखाद्याप्रसंगी काही अप्रिय घटना घडल्यास त्या घटनेचा गंभीर परिणाम कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन तत्पर असते. रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी आपली गुणवत्ता आणि तत्परता तपासण्यात येते. याचाच एक भाग म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले. यात वरिष्ठ विभागीय सतर्कता अधिकारी एस. आर. किरार यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य आतंकवादी कारवाया पुढे ठेऊन बनावट दुर्घटनेची योजना तयार करण्यात आली. यात वर्धा-नागपूर सेक्शनमध्ये अजनी कॅबिन आणि अजनी आरआरआय (रुट रिले इंटरलॉकिंग’ दरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १२११९ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये काही असामाजिक तत्त्वांनी बॉम्बस्फोट घडविला असून यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून कोचला मोठी आग लागल्याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेली रेल्वेगाडी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी रवाना करण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची चमू, भारत स्काऊट-गाईडची मदत घेण्यात आली. या मॉक ड्रीलचा उद्देश आपात्कालीन स्थितीत करावयाची कारवाई आणि घटनेच्या वेळी प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी जाणून घेणे हा होता. मॉक ड्रीलमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सर्व विभागांची तत्परता दिसून आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही घटनेची माहिती मिळताच त्वरित प्रतिसाद दिला. त्यामुळे मॉक ड्रीलच्या आयोजनाचा उद्देश यशस्वी झाला.(प्रतिनिधी)