शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अजनी यार्डात पेट्रोलच्या वॅगनमध्ये स्फोट

By admin | Updated: September 26, 2015 02:57 IST

मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे

मोठी घटना टळली : रेल्वेकडे नाही स्वत:चा अग्निशमन विभागनागपूर : मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे ५८ टन क्षमतेच्या वॅगनचे २०० किलोचे झाकण उडून भयानक स्फोट झाला. ही घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. वॅगनमध्ये पेट्रोल नसल्यामुळे फार मोठी घटना टळली, अन्यथा अजनी परिसर जळून खाक झाला असता. अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळून सकाळी १०.३० वाजता मंडवादेह येथून २५ वॅगन घेऊन आलेली गाडी वडोदरा डिव्हिजनकडे जात होती. दरम्यान या गाडीतील वॅगनमध्ये थोडेफार पेट्रोल असल्यामुळे इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ५८ टन क्षमतेच्या एका वॅगनमध्ये उन्हामुळे गॅस तयार झाला. अजनीचा इंग्रजकालीन पूल १०० फूट अंतरावर असताना या वॅगनचे २०० किलोचे झाकण जोरदार स्फोट होऊन १०० फूट वर फेकले गेले. यामुळे जोरदार आवाज होऊन घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. परंतु वॅगन पेट्रोलने भरलेले नसल्यामुळे मोठी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वॅगन बाजूला काढून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. अजनी परिसरात पेट्रोलने भरलेल्या गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)१९९६ साली विभागाचे विलिनीकरणभारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची गाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेत स्वतंत्र अग्निशमन विभागच नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता उरते. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.