शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंधविश्वासातून महिलांचे शोषण

By admin | Updated: January 19, 2017 02:46 IST

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचे ताजे उदाहरण उघडकीस आले. याप्रमाणे महिलांचे शोषण सुरू सातत्याने सुरू आहे.

बोगस ज्योतिषी व मांत्रिक घेतात गैरफायदा : बदनामीच्या भीतीने तक्रारच होत नाही जगदीश जोशी   नागपूर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचे ताजे उदाहरण उघडकीस आले. याप्रमाणे महिलांचे शोषण सुरू सातत्याने सुरू आहे. बोगस ज्योतिषी किंवा मांत्रिक अंधविश्वासात फसलेल्या महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण करतात. बदनामीच्या भीतीने महिला तक्रारच करीत नाही. एखादा मोठा गुन्हा झाला तरच प्रकरण पोलिसांपर्यंत येते, अन्यथा प्रकरण उघडकीसच येत नाही. सदर पोलिसांनी ४० वर्षीय अमरिश शर्मा याला अटक केली आहे. पीडित २० वर्षीय विद्यार्थिनीची एका मैत्रिणीच्या माध्यमातून शर्मा याच्याशी ओळख झाली. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याने विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार केला होता. यापूर्वी २०१२ मध्ये जरीपटका येथील संन्यालनगरात शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कथित मांत्रिक धनलाभाचे आमिष दाखवून गरीब महिलांना लक्ष्य बनवीत असे. तो महिलांना व्हिडिओ दाखवायचा. त्या व्हिडिीओमध्ये शारीरिक संबंध बनविल्यानंतर नोटांचा पाऊस पडत असल्याचे दिसत असे. या माध्यमातून तो महिला व मुलींचे शोषण करायचा. महिलांना फसविण्यासाठी त्याने एका महिलेला ठेवले होते. त्याच्या या कृत्याची भनक लागताच संन्यालनगरातील संतप्त नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला पकडले. परंतु बदनामीच्या भीतीने एकही महिला तक्रारीसाठी पुढे आली नाही. परिणामी गुन्हा दाखल होऊ शकला नाही. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला सोडून दिले. त्याचप्रकारे डिसेंबर २०१५ मध्ये जरीपटक्यातील बाबादीपसिंहनगर येथे जादूटोण्याने सर्व अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविणाऱ्या एनएडीटीतील कर्मचाऱ्याचा खून करण्यात आला होता. मांत्रिक पत्नीपासून दूर राहत होता. त्याच्याकडे येणाऱ्या बहुतांश महिलाच होत्या. तो त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत असल्याच्या संशयातून पत्नीनेच एका युवकाला आपल्या प्रेमात अडकवून त्याच्या माध्यमातून मांत्रिकाचा खून केला होता. महिलांमध्ये भीती शर्मा याच्याकडे अनेक लोक आपले भविष्य माहीत करून घेण्यासाठी येत होते. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ताज्या प्रकरणामुळे त्या सर्व महिला तणावात आहेत. त्यांचे कुटुंबीय याबाबत विचारपूस करतील, याची त्यांना भीती आहे. काही लोकांनी तर सदर पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूससुद्धा केली आहे.