शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

फुटाळा वगळता अन्य तलावावर विसर्जनाला बंदी : आरोग्य समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:58 IST

मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण विचारात घेता फुटाळा तलाव वगळता शहरातील सर्व १२ तलावावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तलाव सील क रण्याचा निर्णय सोमवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देतलावांना संरक्षण कठडे करणार : विसर्जनासाठी स्टीलच्या टँक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण विचारात घेता फुटाळा तलाव वगळता शहरातील सर्व १२ तलावावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तलाव सील क रण्याचा निर्णय सोमवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी गेल्या वर्षी सोनेगाव व शुक्रवारी तलावत विसर्जनाला बंदी होती. यावर्षी फुटाळा तलावात मोठ्या गणेश मूर्ती वगळता अन्य कोणत्याही तलावात विसर्जन करता येणार नाही. विसर्जनासाठी प्रत्येक झोनस्तरावर कृत्रिम टँक उपलब्ध करण्यात येतात. दरवर्षी या टँक खरेदी करण्यात येतात यावर मोठा खर्च होतो. याचा विचार करता किमान पाच वर्षे उपयोगात येतील असे स्टीलचे कृत्रिम टँक तयार करणे अथवा खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिलीसमितीच्या बैठकीला उपसभापती नागेश सहारे, सदस्य लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे, जितेंद्र घोडेस्वार, ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरिता कामदार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, गणेश राठोड यांच्यासह झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.विसर्जनस्थळी सुविधा उपलब्ध करणारविसर्जनाच्या परिसरात स्वच्छता राहावी यासाठी निर्माल्य कलशांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच पार्किंग, विद्युत व्यवस्था उपलब्ध केली जाईल. गणेशोत्सव मंडळामार्फत पूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेतले जातात. यामधून निघणारा कचरा मनपाच्या स्वच्छता गाड्यांमध्येच टाकला जावा, यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.दहन घाटावर अस्वच्छता आढळल्यास निलंबनमहापालिकेतर्फे शहरातील सर्व दहन घाटावर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्याच धर्तीवर मुस्लीम व ख्रिश्चन कब्रस्थानावर सुविधा उपलब्ध केल्या जातील. दहन घाटावर अस्वच्छता आढळून आल्यास जबाबदार कर्मचाऱ्याला निलंबित केले जाईल असा इशारा वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला.ट्रंक लाईन फु टली; गुन्हा दाखल करानगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी उपस्थित केला. तसेच प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत कामठी रोडवरील पाटणी ऑटोमोबाईलजवळ भारत सिनेमा परिसरात स्क्रोल विनियम प्रा.लि.तर्फे व्यवस्थापक लक्ष्मण मनोहर सावंतद्वारा रॉय उद्योग लि. यांनी सुरू केलेल्या सीताबर्डी येथील प्रस्तावित बांधकामामुळे ७० वर्षे जुनी ट्रंक लाईन फुटली. यासंदर्भात दोषीवर पोलिसात गुन्हा दाखल क रण्याचे निर्देश देण्यात आले.दीड महिन्यात डेग्यूचे २५ रुग्णयाशिवाय कीटकजन्य आजार तसेच डेंग्यूवर उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात १ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान डेंग्यूचे २५ रुग्ण आढळून आले. डांसांचा उपद्रव कमी करण्यासाठी झोनस्तरावर फवारणी करण्यासाठी १३५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांसाठी बारचाट तयार क रणार असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. शहरातील मोकळ्या जागा, भूखंड लक्षात घेऊन याठिकाणी नियमित औषध फवारणी करणे तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवFutala Lakeफुटाळा तलाव