शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाहने जाळणारा विद्यार्थी निष्कासित

By admin | Updated: May 1, 2017 01:24 IST

मेडिकल महाविद्यालयाचा ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने या विद्यार्थ्याला एक वर्षासाठी निष्कासित करण्यासोबत,

एक वर्षासाठी परीक्षेलाही बसता येणार नाही : मेडिकलमधील दुचाकी जळीतकांड नागपूर : मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक दोनमधील विद्यार्थिनींच्या दुचाकी जाळणारा मेडिकल महाविद्यालयाचा ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने या विद्यार्थ्याला एक वर्षासाठी निष्कासित करण्यासोबत, परीक्षेला बसू न देण्याचा कारवाईचा निर्णय घेतला आहे. हा विद्यार्थी लुधियाना येथील रहिवासी असून, अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठाता कार्यालयाजवळच असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक दोनमध्ये १३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी पेटविण्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. दुचाकी जाळणारा आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. गाड्या जाळणारा कुणी बाहेरची व्यक्ती नव्हे तर तो मेडिकलच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. मेडिकल प्रशासनाने याप्रकरणी डॉ. नितीन पाटील, डॉ. राऊत यांच्यासह चार सदस्यांची चौकशी समिती नेमली. या समितीने चौकशी करून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. चौकशीत हा विद्यार्थी ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे ‘स्पष्ट झाले. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी या विद्यार्थ्याला मेडिकल परिसरात, वसतिगृहात प्रवेश राहणार नाही. एक वर्षासाठी महाविद्यालयाची दारे बंद असणार आहे. परीक्षेलाही बसता येणार नाही. स्वत:च्या कृत्यामुळे या विद्यार्थ्याचे एक वर्षाचे नुकसान होणार आहे. मंगळवारी या कारवाईचे आदेश निघणार आहे. विद्यार्थ्यावर झालेल्या या कारवाईमुळे इतर विद्यार्थ्यांवर मात्र चांगलाच वचक बसला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांचीही चौकशी अंतिम टप्प्यात आली असून त्यांच्याकडून काय कारवाई होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) आरोपी विद्यार्थ्यासोबतच मित्रही मोकाट! वसतिगृहासमोरील दोन दुचाकी जाळण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या इतर तीन मित्रांनी सहकार्य केल्याची माहिती समोर आली. पोलीस आरोपी विद्यार्थ्याच्या मित्रांना पकडण्यासाठी वसतिगृहात आले होते. परंतु, ते सापडले नाहीत. पोलीस मुख्य आरोपी असलेल्या विद्यार्थ्याला पकडण्यासाठी गेले आहेत. मात्र, अद्यापही तो विद्यार्थी गवसला नसल्याचे सांगण्यात येते. कारवाईचे आदेश लवकरच दुचाकी जाळणाऱ्या विद्यार्थ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. अहवालही प्राप्त झाला आहे. यात विद्यार्थी दोषी आढळून आल्याने मेडिकल प्रशासनाने त्याला एक वर्षासाठी महाविद्यालयातून निष्कासित करण्याचा, परीक्षेला बसू न देण्याचा व वसतिगृहात प्रवेशही न देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या संदर्भातील आदेश निघेल. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल