शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

बेशिस्त वाहनचालकांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:12 IST

वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत पाच कोटींचे तडजोड शुल्क वसूलअवघ्या तीन महिन्यांत १,७१४ वाहनचालकांवर कारवाईचेंबर तीनच्या वाहतूक पोलिसांचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत पाचपैकी चेंबरच्या तीन पथकाने पाच कोटी, एक लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले आहे.गेल्या काही महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत वाद घालणे, मारहाण करणे आणि त्यांच्या अंगावर वाहने घालण्याचाही प्रकार वाढला आहे. या गैरप्रकारामागची पार्श्वभूमी लक्षात घेता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी कडक मात्र कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाºयांना दिले. शहरातील वाहतूक शाखेच्या चेंबर तीनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी प्रारंभी आपल्याच अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानसाधना आदी शिबिराचे आयोजन करून त्यांना शिस्त लावली. त्यानंतर शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहनचालकांसाठी जनजागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती दिली. त्यानंतर बागुल यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धोकादायक पद्धतीने, वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, ट्रीपल सिट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने (राँग साईड) वाहने चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणे यांच्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू केल्याने वाहतूक शाखेला सहा महिन्यांत पाच कोटी, एक लाख रुपयांचा महसूल दंडापोटी मिळाला. अवघ्या तीन महिन्यात विविध वाहनचालकांचे ३७ हजार २९७ हार्ड चलान बनविण्यात आले. तर, ५३ हजार ९१४ बेशिस्त वाहनचालकांना ई-चालान पाठविण्यात आले.कारवाई अन् समुपदेशनहीपोलीस निरीक्षक बागुल यांच्या माहितीनुसार, २५ ते २८ आॅक्टोबर या तीन दिवसांत विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानात आॅटोचालकांना बैठक व्यवस्था नीट करणे, गणवेश घालून वाहन चालविणे, मर्यादित वेगातच वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे, अवैध प्रवासी वाहतूक न करणे आदींबाबत सूचना, समुपदेशन करण्यात आले. त्याला न जुमानणाºया १७१४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात ५६२ आॅटोचालकांचाही समावेश आहे. या कारवाई दरम्यान २६० वाहने ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, बेशिस्त आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात ई-चालान पाठवून ३१ लाख, ६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वाय. एम. सोलसे, सहायक निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक आखरे, सावरकर, पवार, राठोड आणि केदारे तसेच त्यांच्या सहकाºयांचाही या मोहिमेत विशेष सहभाग असल्याचे या पथकाचे प्रमुख अशोक बागुल यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असे बागुल यांनी लोकमतला सांगितले.