शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

वनबल प्रमुखांनी घेतला प्रशिक्षणार्थी 'आरएफओ' चा क्लास

By admin | Updated: May 9, 2014 02:46 IST

सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकार्‍यांचा (आरएफओ) राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख).....

नागपूर : सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकार्‍यांचा (आरएफओ) राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एस. डब्ल्यू. एच. नकवी यांनी वनभवन येथे क्लास घेतला. दरम्यान, नकवी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना वन्यजीव संरक्षण व व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची अलीकडेच वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

सध्या सर्व प्रशिक्षणार्थी कुंडल येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण घेत आहेत. ते प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांची राज्यभरातील वेगवेगळ्या वन परिक्षेत्रात पदस्थापना करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी त्यांना राज्यातील वन विभागाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने गत २८ एप्रिलपासून अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी वन विभागाचे मुख्यालय असलेल्या 'वनभवन' येथे भेट दिली. यात एकूण २८ प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांचा समावेश होता. दरम्यान, प्रशिक्षणार्थ्यांनी वनभवन येथील जीएसआय कक्षास भेट देऊ न, तेथील संगणक व इंटरनेटद्वारे होत असलेल्या वन्यजीव संरक्षणाची माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) डॉ. मोहन झा, प्रसिद्धी व माहिती अधिकारी कमलाकर धामगे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)