शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा ओळखपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ओळखपत्रांमध्ये त्रुटी, जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला. परीक्षा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस अगोदर ओळखपत्रासाठी त्यांची पायपीट सुरू होती. महाविद्यालयांनी अगोदर ओळखपत्रे डाऊनलोड का केली नाहीत, असा प्रश्न विद्यापीठाकडून करण्यात आला आहे, तर विद्यापीठाने अनेक ओळखपत्रांमध्ये चुका केल्या असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून करण्यात आला आहे. मात्र याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.विद्यापीठातर्फे परीक्षेच्या २ ते ३ आठवडे अगोदरच ‘आॅनलाईन’ परीक्षा ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येते, असे दावे करण्यात येतात. यंदादेखील अनेक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना अगोदरच ओळखपत्र मिळाले. मात्र बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मात्र ओळखपत्रासाठी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रे ‘डाऊनलोड’ होत नसल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. शंभरहून अधिक विद्यार्थी ओळखपत्राच्या प्रतीक्षेत होते.महाविद्यालयांना १८ आॅक्टोबररोजी ‘रोल लिस्ट’ पाठविली होती. त्या आधारे त्यांना संबंधित संकेतस्थळावरून परीक्षा ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करायचे होते. मात्र महाविद्यालयांनी वेळेवर ते काम केले नाही. सोबतच विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांनी चुकीची दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच परीक्षा ओळखपत्र तयार करण्यात आले, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही ?यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना संपर्क केला असता, महाविद्यालयांकडून एकही अधिकृत तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदरच ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करण्याची सुविधा असतानादेखील महाविद्यालये वेळेवरच काम करतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. जर ओळखपत्रांमध्ये त्रुटी होत्या, तर महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, जर विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात त्रुटी असतील, तर त्या लगेच सुधारण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.