शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ वाहनचालकाची संगणकावर परीक्षा

By admin | Updated: April 18, 2015 02:30 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये २० एप्रिलपासून शिकाऊ वाहनचालकांची संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये २० एप्रिलपासून शिकाऊ वाहनचालकांची संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत संगणकाने विचारलेल्या १५ प्रश्नांपैकी ९ प्रश्नांची अचूक उत्तरे नोंदविणाऱ्या उमेदवारालाच शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळेल. शहर आरटीओ कार्यालयाच्या तुलनेत तब्बल पाच वर्षांनंतर ही प्रणाली ग्रामीण आरटीओ कार्यालयात सुरू होत आहे.वाहनचालकाने वाहतूक नियमांचा अभ्यास करावा, त्यांना वाहतूक नियमाची माहिती व्हावी, वाहतूक चिन्हांची ओळख व्हावी, यासाठी १२ डिसेंबर २०११ पासून आरटीओ (शहर) कार्यालयाने लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय परीक्षा सुरू केली. त्याच्यापाठोपाठ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये सुरू झाली. परंतु ग्रामीण आरटीओ कार्यालयामध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर उशिरा का होईना, संगणक परीक्षा सुरू करण्याचे निर्देश आले, सोबतच आवश्यक साहित्यही उपलब्ध झाले. ८ मिनिटांत द्यावी लागणार १५ प्रश्नांची उत्तरे लर्निंग लायसन्स संगणक परीक्षेसाठी २२ संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात प्रत्येकाला ८ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. या वेळात १५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यापैकी ९ अचूक उत्तरे देणाऱ्या उमेदवाराला उत्तीर्ण म्हणून घोषित करण्यात येईल. विशेष म्हणजे, प्रत्येक संगणकावरील प्रश्नावली वेगवेगळी राहील. हे प्रश्न इंग्रजी व मराठी भाषेत असतील. उमेदवारांसमोर प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय उपलब्ध असणार आहे. कार्यालयाच्या दैनंदिन कामाची व्याप्ती व वीज भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात घेऊन या प्रणालीतून दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चाचणी घेता येणार आहे. या वेळेतच उमेदवारांना शिकाऊ परवान्याच्या चाचणीसाठी यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)