शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; विदर्भात अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स बिघडल्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 09:47 IST

महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील नूतन प्राथमिक शाळेत असलेल्या २०४ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन सकाळी ८ वाजल्यापासून बंद पडली आहे. या मशीनची बॅटी डाऊन असल्याचे सांगितले जाते. मतदारांनी बाहेर रांगा लावल्या असून, त्यांना दुसऱ्या मशीनच्या प्रतिक्षेत तिष्ठत रहावे लागते आहे. येथे आता दुसरी मशीन लावण्याची धडपड सुरू झाली आहे. दुसºया घटनेत भंडारा जिल्ह्यातील सीतेपर येथे मशीनमध्ये सकाळी ९ च्या सुमारास बिघाड झाला. येथेही नागरिक मतदानाच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे आहेत.गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव येथील पिंडकेपार येथे असलेल्या मतदान केंद्रात तीन नागरिकांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. येथे दुसºया मशीनच्या प्रतिक्षेत नागरिक रांगेत तिष्ठत आहेत.  नागपुरात दाभा येथे जैस्वाल हायस्कुलमध्ये मशीन एक तास उशिरा सुरु झाली.

नागपुरात प्रतापनगर येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स या शाळेत आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर दहा मिनिटातच मशीन बंद पडली. त्याला सुरू करण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे लागली. दुसºया एका घटनेत बोरगाव येथे असलेल्या बूथ क्र. ५१ मध्येही मशीन बंद पडली होती. 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019