शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

सर्वत्र ‘जयभीम’चा निनाद

By admin | Updated: April 16, 2016 02:39 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

बाबासाहेबांना हजारो अनुयायांनी केले अभिवादन : विविध संस्था, संघटनांतर्फे आयोजननागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांसह आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी व संविधान चौक येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. एकूणच जय भीमच्या घोषणांनी आसमंत निनादला होता. सेंट्रल रेल्वे मजदूर संघसंघटनेच्या प्रशासनिक शाखेतर्फे कॅरेज अँड वॅगन विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशासनिक शाखेचे प्रमुख बिपीन पाटील, विभागीय सचिव देबाशिष भट्टाचार्य, जी. एम. शर्मा उपस्थित होते. संचालन युजिन जोसेफ यांनी केले. यशस्वितेसाठी बाबू बिंद्रायण, ए. के. गुप्ता, वैभव आळणे, सरोज गायकवाड, विजय वाघमारे, पुरुषोत्तम वानखेडे, यशवंत मते, आशिष नांदगावे, सुशील पसेरकर, श्याम गौर, रिना सुटे, प्रियंका स्वामी, बंसमणी शुक्ला, प्रमोद खिरोडकर यांनी परिश्रम घेतले.महाराष्ट्र बिल्डींग कन्स्ट्रक्शन फॉरेस्ट अ‍ॅण्ड वूड वर्कर्स युनियनसंघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सीताबर्डी येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी राजेंद्र रामटेके, दादाराव डोंगरे, रामगोविंद खोब्रागडे, अरुणा रामटेके, प्रकाश डेहनकर, ऐश्वर्या देशपांडे, विनिता तिवारी, अतुल आवळे, चेतन लांबाडे, सुशिल डोंगरे, रोहित झा, नितेश शेंडे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयमहाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रमण चिमूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील गायकवाड, विजय सहारे, विष्णु पानतावणे, सचिन आग्र, रामचंद्र गोपनारायणे उपस्थित होते. संचालन प्रशांत परिपवार यांनी केले. आभार आकाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला अरुण वाठ, कुणाल खैरकर, विद्युत वाघमारे, प्रभाकर लांडगे, विनोद कुसराम, अखिल पारलेवार, गोपाल चंगानी, अ‍ॅड सचिन शेंडे उपस्थित होते. अखिल भारतीय धम्मसेना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला भिक्खू संघाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण पंचशील तसेच बुद्ध वंदना सादर केली. यनंतर केक कापून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मिहान इंडिया प्रभारी वरिष्ठ विमानतळ निदेशक आबीद रुही, विमानतळ निदेशक रोशन कांबळे, सल्लागार एस.व्ही. चहांदे, राहुल कराडे, रवी मेंढे, भंते नागघोष, भंते नागसेन, भंते नागधम्म, भंते धम्मविजय, नागानंद, भंते धम्मानंद, भंते धम्मबोधी, भंते नागदीप, धम्मउदय, भंते धम्मकाया प्रामुख्याने उपस्थित होते. कृपाल तुमाने शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अमित कातुरे, विवेक नवले, शेखर घटे, रोशन तितरमारे, सेहेल अहमद, स्वप्नील शिरपूरकर, रोशन ठाकरे, महेंद्र खराडे, किशोर तिजारे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हेमंत गडकरी, उमेश बोरकर, महेश माने, रितेश जगतप, सुजित मधुमटके, सुचित खेर, शिवांस प्रजापती, भीमराव हाडके, राजकुमार मेश्राम, प्रकाश बोंद्रे आदी उपस्थित होते.