शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचे प्राण वाचविणाऱ्या मानेंचे सर्वत्र कौतुक

By admin | Updated: September 18, 2016 02:53 IST

थेट मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या एका युवकाला सहीसलामत बाहेर काढणारे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्तांनी दिले प्रशस्तीपत्र : रिवॉर्डही जाहीर नागपूर : थेट मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या एका युवकाला सहीसलामत बाहेर काढणारे धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनीही माने यांचे कौतुक करून प्रशस्तीपत्र तसेच साडेसात हजारांचा रिवॉर्ड जाहीर केला. सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू शुक्रवारी नागपुरात आली होती. हिलटॉपवरील एकता गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये पोहचलेल्या आर्चीची एक झलक बघण्यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कुणी इमारतीवर, कुणी बालकनीत कुणी भिंतीवर तर कुणी विविध वाहनांच्या टपावर चढले होते. काही जण बाजूच्या कुंपण भिंतीवर उभे होते. त्यातील अक्षय विठ्ठलराव वैद्य (रा. डागा लेआऊट अंबाझरी) या युवकाचा बाजूलाच असलेल्या डीपीला (ट्रान्सफार्मर) स्पर्श झाला. तो ट्रान्सफार्मरलाच चिकटल्याचे लक्षात आल्याने बाजूची मंडळी पळाली. एका व्यक्तीने इमारतीवरून पोलिसांना मुलाला करंट लागल्याचा इशारा केला. ठाणेदार माने यांचे लक्ष जाताच त्यांनी तात्काळ एका पोलिसाची काठी हातात घेऊन अक्षयला ट्रान्सफार्मर पासून वेगळे केले. त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी बाजूच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्याची प्रकृती चांगली आहे. त्याचा जीव मानेंच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे बचावल्याचे कळताच मानेंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाऊ लागले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी स्वत: फोन करून मानेंचे कौतुक केले. लगेच त्यांना साडेसात हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला. प्रशस्तीपत्रकही पाठवले. माने यांचे अभिनंदन करीत अवघ्या पोलीस दलाने त्यांना ‘सॅल्यूट‘ केला. (प्रतिनिधी)