शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला मिळाली स्वायत्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 10:22 IST

Nagpur News मध्य भारतातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला अखेर स्वायतत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे‘युजीसी’ची मंजुरी ३० वर्षांनंतर प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला अखेर स्वायतत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भातील प्रस्ताव व शिफारशींना मंजुरी दिली आहे. शुक्रवारी याची माहिती संस्थेला देण्यात आली. मागील ३० वर्षांपासून स्वायत्तता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू होते.

संस्थेला १० वर्षांसाठी स्वायत्तता मिळाली आहे. हा अवधी संपल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परत संस्थेच्या कार्याची समीक्षा करण्यात येईल. २०२१-२२ या सत्रापासून ही स्वायतत्ता लागू होईल.

१३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूने ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चा दौरा केला होता. दोन दिवसीय पाहणीनंतर समितीने २० फेब्रुवारी रोजी आयोगाला अहवाल सादर केला होता, अशी माहिती संचालक डॉ. रामदास आत्राम यांनी दिली.

स्वायत्ततेचे हे होणार फायदे

-‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला स्वत:चा अभ्यासक्रम तयार करता येईल.

- विद्यार्थ्यांची परीक्षादेखील संस्था घेऊ शकेल.

- संशोधनाला प्रोत्साहन मिळेल.

- ‘आऊटडेटेड’ अभ्यासक्रम हटवून नवीन अभ्यासक्रम आणता येतील.

- नवीन अभ्यासक्रम कमी वेळात लागू करता येईल.

१९९० मध्ये झाला होता पहिला प्रयत्न

संस्थेला स्वायतत्ता मिळवून देण्यासाठी १९९० मध्ये पहिल्यांदा प्रयत्न झाला होता. मात्र नागपूर विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले व प्रस्ताव संमत होऊ शकला नाही. २००८ मध्येदेखील प्रयत्न झाले, मात्र विद्यापीठाकडून मंजुरी मिळू शकली नाही. २०१५ मध्ये तत्कालीन संचालक डॉ. भारंबे यांनी प्रयत्न केले. मात्र विद्वत्‌ परिषदेची मंजुरी मिळाल्यावर पुढे काहीच पावले उचलण्यात आली नाही. २०१८ मध्ये यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला व २०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने पाहणी समिती गठित केली.

जुन्या विद्यार्थ्यांकडून स्वागत

‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून शिकलेले विद्यार्थी देश-विदेशात स्थायिक झाले असून, सर्वच क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. संस्थेला स्वायत्तता मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच शिक्षकांमध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. स्वायत्ततेमुळे शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र