शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वाडीला नगर परिषदेचा दर्जा

By admin | Updated: August 26, 2014 01:05 IST

बहुप्रतीक्षित वाडी ग्रामपंचायतला अखेर नगर परिषदेचा दर्जा मिळाला. याबाबतचा आज, सोमवारी अंतिम अधिसूचना जारी झाली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना अखेर ‘ब्रेक’ मिळाला असून, विकासाला गती मिळेल.

अंतिम अधिसूचना जारी : काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोषवाडी : बहुप्रतीक्षित वाडी ग्रामपंचायतला अखेर नगर परिषदेचा दर्जा मिळाला. याबाबतचा आज, सोमवारी अंतिम अधिसूचना जारी झाली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना अखेर ‘ब्रेक’ मिळाला असून, विकासाला गती मिळेल. शासनाचा आदेश धडकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाडीत जल्लोष केला.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमदेवाराच्या प्रचारासाठी वाडी येथे आले असता त्यांनी वाडीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासाठी माजी मंत्री मुकुल वासनिक यांनीही सतत पाठपुरावा केला. त्यानंतर याबाबत पहिली अधिसूचना, दुसरी अधिसूचना निघून यावर आक्षेप मागविण्यात आले. दरम्यान, आचारसंहिता लागल्याने यावरील अंतिम अधिसूचना निघू शकली नाही. बरेच दिवस होऊनही वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा न मिळाल्याने विरोधकांनी ‘आश्वासन हवेत विरले’ असा सूर आवळला होता. मात्र आज निघालेल्या अधिसूचनेने सर्व चर्चांना विराम मिळाला. शासनाचा आदेश धडकताच वाडी ग्रामपंचायत सचिवालयासमोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, काँग्रेस नेते नाना गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रणिता कडू यांच्या नेतृत्वात ढोलताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य भारती पाटील, प्रमिला पवार, माजी सरपंच बेबी ढबाले, भीमराव कडू, अनिल पाटील, गोविंद रोडे, वसंता इखनकर, निशांत परबत, चंद्रशेखर येवले, संगीता फ्रान्सिस, छाया डोंगरे, ज्ञानेश्वर गावंडे, गौतम तिरपुडे, नरेंद्र आमदरे, राजू मिश्रा, महेश चोखांद्रे, देवराव कडू, सुजित अधिकारी, असलम खान, बंडू गजभिये, रॉबिन शेलारे, शशिकांत देठे, विष्णू आदमने, मंगेश भड, रमेश चतुर्वेदी, संजय जीवनकर, भीमराव कांबळे, मनोज फुले, अरविंद उमप, अशोक ढोके, वासुदेव वर्मा, इंदू देवासे, आनंद इंगोले, दशरथ वांगे, नलिनी धोटेकर, अनिता रावलकर, वर्षा मेश्राम, शोभा वाटकर, पद्मा तल्हार, सीमा धुमाळ, शारदा ढोणे, नितीन कोहपरे, नामदेव चवने, श्याम कुलरकर, दीपक कडू, हरिदास इंगळे, रेखा रोडे, रामभाऊ गुडधे यांच्यासह इतर कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. या आदेशामुळे वाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि वाडी ग्रामपंचायतच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. (प्रतिनिधी)