शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

‘फ्युजन म्युझिक’ रंगलेली सायंकाळ

By admin | Updated: June 9, 2014 01:20 IST

कलावंतांच्या हृदयात संगीत कायम असते. मनाची प्रसन्नता गडद झाली की ते मधुरतेने गायकांच्या ओठांवर येते. वादकांच्या सुरेल वादनाने त्याला साज चढतो. अशाच नवोदित जवळपास १00

अँम्बियन्स बँड : कलावंताचे तयारीचे सादरीकरण नागपूर : कलावंतांच्या हृदयात संगीत कायम असते. मनाची प्रसन्नता गडद झाली की ते मधुरतेने गायकांच्या ओठांवर येते. वादकांच्या सुरेल वादनाने  त्याला साज चढतो. अशाच नवोदित जवळपास १00 बाल-युवा गायक-वादक कलावंतांच्या फ्युजन म्युझिकच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक  सभागृहात करण्यात आले. अँम्बियन्स बँडतर्फे नागपुरातील ५0 गिटारिस्ट, २0 गायक आणि २0 तबलावादक तसेच सिंथेसायझर, वेस्टर्न ड्रमसेट व मायनर वादकांनी भारतीय  शास्त्रीय संगीतातील रागांसह हिंदी - मराठी लोकप्रिय गीतांचे पाश्‍चात्त्य सुरावटींसह केलेल्या सादरीकरणाने रसिकांना जिंकले. या कार्यक्रमाची  संकल्पना व मार्गदर्शन कांचन चारभाई व राकेश वानखेडे यांचे होते. नव्या पिढीला संगीताची गोडी लागावी व त्यांनी संगीताकडे आकर्षित व्हावे म्हणून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनराज कुंटे, आकांक्षा चारभाई, शिवानी पांढरे, अे. आर. तुरकर, सुरेंद्र टेंभुर्णे, रोहित अतकरे,  कमोलिका मंडल, सुकन्या पाटील, आलेख तायवाडे, रितेश यादव, अखिलेश संगेवार, सुरज बावणे, अरमान इंदूरकर, निखिल ताकसांडे, मंगेश  वानखेडे हे सहभागी गायक होते. नटरंग चित्रपटातील नांदीने या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘एकदंताय विघ्नहर्ताय.., लुका छुपी  बहोत हुई.., सावरिया.., खेळ मांडला., इत्तीसी हसी.., अप्सरा आली.., कुहू कुहू बोले सावरिया..’ आदी वैविध्यपूर्ण गीतांनी हे सादरीकरण रंगले.  याप्रसंगी राग हंसध्वनीचे सादरीकरण झाले. ‘मोरया.मोरया..’ आणि वंदेमातरमने या कार्यक्रमाचे समापन झाले. सुनील इंदूवामन ठाकरे यांनी  परिचयात्मक काव्यात्मक प्रस्तावना केली. एजाजखान यांनी निवेदन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार नंदू अंधारे, मधुरिका गडकरी, प्रवीण  खापरे व कांचन चारभाई यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)