शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

जरीपटक्यात हत्या

By admin | Updated: January 18, 2015 00:51 IST

जरीपटक्यातील बाबादीपसिंग नगरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रमेश रावजी देशभ्रतार (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर

गळा दाबला : जादुटोण्यावरून घटना घडल्याचा संशय नागपूर : जरीपटक्यातील बाबादीपसिंग नगरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रमेश रावजी देशभ्रतार (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) शिपायी (चपराशी) म्हणून सेवारत होते. जादुटोण्यातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पागलखाना चौकाजवळच्या एनएडीटी क्वॉर्टर नं. ११ मध्ये ते राहात होते. बाबादीपसिंग नगरात त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले. आज सकाळी ९ वाजता बांधकामावर आलेल्या एका मजूर महिलेला ते गच्चीवर पडून दिसले. झोपून असावे, असे समजून तिने त्यांना आवाज दिले. प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने अन्य मजुरांना सांगितले. त्यांनी नंतर घरच्यांना आणि पोलिसांना कळविले. माहिती कळताच जरीपटक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांना मारहाण केल्यानंतर गळा दाबून मारल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. मृतदेह रुग्णालयात पाठविल्यानंतर डॉक्टरांनीही तसाच अहवाल दिला. तोंडावर आणि गळ्यावर मारहाण केल्यामुळे देशभ्रतार यांचा एक दात पडला. हत्येनंतर देशभ्रतार यांचा मोबाईल, एटीएम कार्ड, सोने आणि चांदीची प्रत्येकी एक अंगठी आरोपीने लंपास केली. पोलिसांनी हत्या व लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.ड्युटी नंतर दरबारपोलिसांच्या माहितीनुसार, रमेश देशभ्रतार ड्युटी संपल्यानंतर ‘दरबार‘ भरवायचे. आठवड्यातून विशिष्ट दिवशी दरबारात आलेल्यांना लिंबू, गंडेदोरे, राख आणि औषधे द्यायचे. त्यासाठी त्यांनी एक विशेष रूम तयार केली होती. यात विविध देवदेवतांचे फोटो लावले आहेत. काचेची दानपेटी आणि अंगारा (राख) भरलेला मोठा डबा, तसेच काही ‘शक्तिवर्धक औषधेही पोलिसांना आढळली. ते सर्व जप्त करण्यात आले. धुपारे घेणारानेच दाखवले काम ?रमेश देशभ्रतार यांची हत्या त्यांच्या दरबारात येणाऱ्यापैकीच कुणी ‘पीडिताने‘ केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. गंडादोरा तसेच अंगारा धुपारा करून असाध्य आजार बरा करण्याचा आणि पुत्रप्राप्तीचा दावा देशभ्रतार करीत होते. लाभ न झालेल्या किंवा त्यातून वाद झाल्यामुळेच एखाद्या पीडिताने त्यांची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.