शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेला तरी बेहत्तर काँग्रेससाठी सभा घेणारच

By admin | Updated: February 12, 2017 02:17 IST

महापालिकेत काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी चांगले काम करणाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली.

अशोक चव्हाण : संघ व भाजप विरोधात आमची लढाई नागपूर : महापालिकेत काँग्रेसची सत्ता यावी, यासाठी चांगले काम करणाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे काही जण नाराज आहेत. प्रत्येकच पक्षात असे असंतुष्ट लोक असतात. परंतु काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मदत करीत आहे. त्यांचे हे प्र्रयत्न हाणून पाडू. पक्षासाठी जीव गेला तरी बेहत्तर याची मला पर्वा नाही. पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेणारच, असा निर्धार माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त दिला. हसनबाग चौकात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. काही असंतुष्टांनी सभा सुरू असतानाच शाई फेकण्याचे कृ त्य केले. भ्याडपणाचा हा प्रकार आहे. ज्या कोणी हे कृ त्य केले, त्याचा निषेध करतो. अशा घटनांना सडेतोड उत्तर देऊ. अशा घटनातून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला. संघ व भाजपला रोखण्याची गरज आहे. सर्वसामान्यांची ही लढाई आहे. यासाठी जे सोबत येईल, त्यांना सोबत घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे लोक खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप करतात. परंतु तुम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री असूनही आरोप करीत आहात. म्हणजेच तुम्ही सरकार चालवू शकत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा असल्याचे सांगतात. परंतु राजीनामा कधी देणार,असा प्रश्न उपस्थित करून भाजप व शिवसेना यांच्यात संगनमत असून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातच नागपूर शहराचा विकास झाला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूरच्या विकासासाठी निधी दिला. काँग्रेसच्याच काळात मिहान, मेट्रो यासारखे प्रकल्प मंजूर करण्यात आले. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली तर शहराचा जलद विकास करू, असे आश्वासन देत २०१९ निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.(प्रतिनिधी)