शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

जरीपटक्यात दुहेरी हत्याकांड पत्नीसह भाच्यालाही संपविले

By admin | Updated: October 18, 2015 03:13 IST

मेव्हण्याने फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका नराधमाने पत्नी आणि मेव्हण्याच्या मुलाची (भाच्याची) निर्घृण हत्या केली.

नागपूर : मेव्हण्याने फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका नराधमाने पत्नी आणि मेव्हण्याच्या मुलाची (भाच्याची) निर्घृण हत्या केली. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीला नगरात (नारी) हा थरार घडला. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तर नागपुरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गोपीबाई कांबळे (वय ५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. चिमुकल्यासह पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना संपवणाऱ्या नराधमाचे नाव शरनू ऊर्फ अण्णाजी कांबळे (वय ६०) आहे.आरोपीचे घर तक्षशिलानगरात असून, त्याला तीन मुली आहेत. या तिन्हींचे विवाह झाले असून, त्या पुण्यात राहतात. आरोपी शरनू दारुड्या आहे. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो मिळेल काम करतो. त्याचा कवडीचा हातभार नसल्यामुळे गोपीबाई भाजी विकून नवऱ्याला पोसायची. गोपीबाईचे माहेर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव येथे आहे. तिचे भाऊ मधुकर रामपुरे यांचा मुलगा चेतन गोपीबार्इंकडे शिक्षणाच्या निमित्ताने राहतो. तो नारीच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होता. आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या चेतनवर आत्या गोपीबाईची विशेष माया होती. चेतनही शाळा आटोपल्यानंतर आत्याला भाजी विकण्यास मदत करायचा. तो आत्याचा पदर सोडत नव्हता. (प्रतिनिधी)फोनने केला घातशरनूला दारू चढल्यानंतर त्याचे स्वत:वर नियंत्रण राहत नव्हते. घरी येऊन तो मध्यरात्रीपर्यंत बडबड करायचा. त्यावरून पत्नी गोपीबाईसोबत त्याचे नेहमीच भांडण व्हायचे. शुक्रवारी रात्री आरोपी शरनू नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झोकांड्या देतच घरी आला. त्याने अंगणात उभे राहून शिवीगाळ सुरू केली. गोपीबाईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिला त्याने मारहाण केली. चेतनलाही शिव्या घातल्या. नेहमीच्या कटकटीला कंटाळलेल्या गोपीबाईने आपल्या भावाला फोन करून ही माहिती दिली. ते ऐकून संतप्त झालेल्या मधुकर रामपुरे यांनी लगेच शरनूला फोन देण्यास सांगितले. शरनूने फोन घेताच त्याच्याशी रामपुरेंची बाचाबाची झाली. शरनू शिवीगाळ करीत असल्यामुळे रामपुरेंनी त्याला फोनवरूनच हातपाय तोडण्याची धमकी दिली. ती ऐकून शरनूचा पारा चढला. त्याने रामपुरेंसह पत्नीचाही उद्धार करणे सुरू केले. मध्यरात्र झाली तरी त्याचा राग कमी झाला नव्हता.परिसरात थरार, आरोपी पसारगोपीबाई आणि चेतनच्या किंकाळ्या ऐकून जागे झालेल्या शेजाऱ्यांनी शरनूच्या घराकडे पाहिले. आक्रित घडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी परिसरातील अन्य काहींना जागविले. त्यामुळे नराधम शरनू बाहेर पळाला. दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्याने जरीपटक्याचा ताफा घटनास्थळी पोहचला. शरनूच्या घरात गोपीबाई आणि तिच्या भाच्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने शेजारीच नव्हे तर पोलिसांच्या अंगावरही काटा उभा राहिला. त्यांनी लगेच शरनू पळालेल्या दिशेने धाव घेऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला शनिवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. या हत्याकांडामुळे तक्षशिला नगरात तीव्र शोककळा पसरली आहे. किंकाळ्यांनी हादरला परिसरआरोपी रात्रभर जागाच होता. त्याने घरातील जंगलेली कुऱ्हाड शोधली. पहाटे २.३० च्या सुमारास तो गोपीबाईच्या जवळ गेला आणि त्याने तिच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. गोपीबाईच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला.