शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

अ‍ॅनलॉकनंतरही ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरू नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

जलालखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन ...

जलालखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बस सेवा बंद करण्यात आली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या सेवा पुन्हा बंद करण्यात आल्या. अ‍ॅनलॉकनंतर ७ जूनपासून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील काटोल आगाराने अजूनही जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा बस सेवा सुरू केलेली नाही. अनलॉकला आठवडा उलटूनही बस सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कृषी विषयक कार्यालयीन कामाकरिता शेतकऱ्यांना नरखेड येथील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जलालखेडा परिसरात जवळपास २० ते ३० गावे आहेत. पण सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने येथील नागरिकांना तालुक्याची स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांना जास्त पैसे द्यावे लागतात. अंबाडा हे गाव नरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे त्या बाजूने खासगी वाहनेसुद्धा जात नाही. त्या भागातील नागरिकांना खरेदीसाठी किंवा कामानिमित्त जलालखेडा, काटोल, नरखेड जाण्याकरिता एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहे.

---

जलालखेडा ते नरखेड व काटोल ते अंबाडा या दोन्ही मार्गावरील बस सेवा एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल.

- कुलदीप रंगारी, व्यवस्थापक, काटोल आगार

----

जलालखेडा ते नरखेड बस सेवा बंद असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतीच्या कामासाठी नरखेड येथील कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात जावे लागते. परंतु या मार्गावरील बस बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा लवकर सुरू करण्यात यावी.

- हेमंत ठोंबरे, शेतकरी, मुक्तापूर.