शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन उधळल्यावरही विदर्भवाद्यांनी पुन्हा मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:10 IST

नागपूर : ... परवानगीवरून वाद या आंदोलनाला परवानगी नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कालही ...

नागपूर : ...

परवानगीवरून वाद

या आंदोलनाला परवानगी नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कालही पहिल्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न केला होता. ठिय्या दिलेल्या मार्गावरून वाहन चालविण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला होता. मात्र कार्यकर्त्यांची अधिक संख्या असल्याने व आंदोलक उत्साहात असल्याने काल ही कारवाई टाळली होती. आज सकाळी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड केली.

...

आम्ही परवानगी मागितली होती - नेवले

या संदर्भात ‘लोकमत’कडे दिलेल्या प्रतिक्रियेत संयोजक राम नेवले म्हणाले, ६ ऑगस्टला आम्ही तहसील पोलिसांकडे रीतसर अर्ज करून आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आंदोलनाचा दिवस उगवूनही परवानगी देण्याचे पोलिसांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे आम्ही नियोजत घोषणेनुसार आंदोलन केले. ते १५ ऑगस्टपर्यंत सुरूच राहील. विदर्भ चंडिका मंदिराला विदर्भ लढ्याचा इतिहास आहे. त्यामुळे हे आंदोलन येथूनच होईल.

...

आंदोलन पुन्हा सुरू

पोलीस ठाण्यातून बाहेर पडून आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत शहीद चौकाकडे कूच केले. दरम्यान, टांगा चौकात सुमारे पाऊण तास ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर पुन्हा शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरात पोहोचून ठिय्या आंदोलन सुरू केले. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी मात्र रस्त्यावर ठिय्या न देता आंदोलकांनी मंदिराच्या प्रांगणात ठिय्या दिल्याने कालच्यासारखा वाहतुकीला व व्यापाऱ्यांना अडथळा झाला नाही.

....

महिला आंदोलकांनाही ओढत नेले

आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी कार्यकर्ते पोहचत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. मुकेश मासुरकर व इतर आंदोलनकर्त्‍यांना जबरदस्‍तीने ओढत नेत व्‍हॅनमध्‍ये बसवून तहसील पोलीस स्‍टेशनला नेले. महिला कार्यकर्त्‍यांनाही मनगटाला धरून जबरदस्‍तीने फरफटत ओढत नेले. दिव्यांग महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषा लांबट यांच्या हाताला आणि पायाला खरचटले. महिला आघाडीच्‍या अध्‍यक्षा रंजना मामर्डे यांच्‍याशी झालेल्‍या झटापटीत त्‍यांचेही कपडे फाटले.

...