शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:20 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारी वकिलांची फौज कार्यरत असून, त्यापैकी अनेक जण बिनकामाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून न्यायालयाने कान टोचल्यामुळे राज्य सरकार पॅनलमधील वकिलांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास राजी झाले आहे. त्यासाठी दोन आठवड्यांत यंत्रणा व मापदंड निश्चित करण्याची ग्वाही न्यायालयाला सोमवारी देण्यात आली.

ठळक मुद्देहायकोर्टात सरकारची ग्वाही : दोन आठवड्यांत ठरणार मापदंड

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारी वकिलांची फौज कार्यरत असून, त्यापैकी अनेक जण बिनकामाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून न्यायालयाने कान टोचल्यामुळे राज्य सरकार पॅनलमधील वकिलांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास राजी झाले आहे. त्यासाठी दोन आठवड्यांत यंत्रणा व मापदंड निश्चित करण्याची ग्वाही न्यायालयाला सोमवारी देण्यात आली.न्यायमूर्ती रोहित देव यांनी सरकारी वकिलांची गुणवत्ताहीनता गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी दणका दिल्यामुळे राज्य सरकार व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढे आले. या प्रकरणातील न्यायालय मित्र वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांच्या विनंतीवरून न्यायालयाने सरकारी वकिलांच्या मूल्यमापनासाठी निश्चित करावयाची यंत्रणा व मापदंडामध्ये कामगिरीतील नियमितता, प्रकरणाविषयीची बांधिलकी, प्रकरणातील तथ्ये व कायद्याचा सखोल अभ्यास, सामान्य शिस्त आणि न्यायालय शिष्टाचार या बाबींचा समावेश करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.सरकारी वकील कार्यालयात विविध पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे सरकारी वकिलांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उच्च न्यायालय हा विषयदेखील हाताळणार असून, त्यासाठी २६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.सरकारी वकिलांची संख्या निश्चित करणारकोणत्या न्यायालयात किती सरकारी वकील नियुक्त करायचे, याबाबत सध्या काहीच धोरण नाही. त्यामुळे सरकारी वकिलांच्या मनमानी पद्धतीने नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यांच्या मानधनावर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च होत आहे. उच्च न्यायालयाने यावरही नाराजी व्यक्त करून सरकारला फटकारले होते. परिणामी, सरकारने कोणत्या न्यायालयात किती सरकारी वकील नियुक्त करायचे, याबाबत एक महिन्यात निकष ठरविण्याची ग्वाही न्यायालयाला दिली. वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांच्याशी चर्चा करून हे निकष ठरवले जाणार आहेत. तेव्हापर्यंत सरकारी वकिलांच्या नवीन नियुक्त्या व पुनर्नियुक्त्या करण्यात येणार नाही आणि कुणाला मुदतवाढही देण्यात येणार नाही, असे सरकारने न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :advocateवकिलGovernmentसरकार