शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:04 IST

मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे.

ठळक मुद्देमहिना उलटला : मूल्यांकनाचा आकडा १७ हजारांच्या आतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे. मूल्यांकनादरम्यान तांत्रिक अडचणींचचा सामना करावा लागत आहे. ज्या कालावधीत लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व्हायला हवे होते, तेथे आतापर्यंत १७ हजार उत्तरपत्रिकादेखील पूर्णपणे तपासून झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असून लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. राज्यपालांनी दिलेली ‘डेडलाईन’ निघून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन पूर्ण झालेले नाही. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी महाविद्यालयात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला जागा उपलब्ध करून दिली होती. तेथे वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे. मात्र वारंवार येणाºया तांत्रिक अडथळ्यांमुळे आतापर्यंत मूल्यांकन झालेल्या उत्तरपत्रिकांनी १७ हजारांचा आकडादेखील गाठलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.सुरुवातीच्या चर्चेनुसार १० दिवसांतच साधारणत: लाखभर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबई विद्यापीठातील मूल्यांकनाचे ‘सॉफ्टवेअर’ वेगळे आहे. शिवाय संथ ‘सर्व्हर’मुळे उत्तरपत्रिका ‘ट्रान्सफर’ करण्यास वेळ लागतो आहे. महिना उलटून गेल्यानंतरदेखील ही समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे लाखोंऐवजी केवळ १७ हजारांच्या आसपासच उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन होऊ शकले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डॉ. बबन तायवाडे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.