शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युरोपियन पाहुणे नागपूरकरांच्या भेटीला

By admin | Updated: February 27, 2017 02:09 IST

पळसाचे झाड फुलाने बहरत नाही तोच युरोप खंडातून विदेशी पाहुण्यांचे थवे नागपूर भेटीला आले आहेत.

पळस मैनाच्या विहाराने व्यापत आहे आकाश : गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाली शिकार नागपूर : पळसाचे झाड फुलाने बहरत नाही तोच युरोप खंडातून विदेशी पाहुण्यांचे थवे नागपूर भेटीला आले आहेत. हे पाहुणे आहेत ‘पळस मैना’. समूहाने राहणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याने आसमंत व्यापत आहे. मात्र, हजारो किलोमीटरचे अंतर कापून आलेल्या या पक्ष्यांवर शिकारीची नजर आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्ये या पक्ष्यांची विक्री झाल्याचे पक्षिप्रेमींचे म्हणणे आहे. या पक्ष्याला मराठीत पळस मैना, तेलगूमध्ये पळीसा तर इंग्रजीत ‘रोजी स्टारलिंग’ असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘स्टर्न्स रेसियस’ आहे. मैनेसारखा दिसणाऱ्या या पक्ष्याचा रंग फिक्कट गुलाबी असतो. गडद केशरी रंगाचे पाय तर पंख, शेपटी, गळा डोके आणि छाती काळ्या चकचकीत रंगाचे असते. चोच पिवळ्या रंगाची असते. पळस मैनेच्या डोक्यावर तुरा दिसतो आहे, हा तुरा नर पक्ष्याच्या डोक्यावर विणीच्या हंगामात दिसतो. शेपटीच्या खाली पायाजवळ काळ्या ठिपक्यांची नक्षी दिसते. पक्षी अभ्यासकांच्या मते, युरोपमधील स्थलांतरित पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. परंतु हा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होतो. सध्या नागपूरमध्ये आलेले हे पक्षी परतीच्या प्रवासावर आहेत. नागपुरात आठ ते दहा दिवस मुक्काम करून ते निघून जातात. परत दुसरे थवे त्यांची जागा घेतात. या पक्ष्यांना प्रवासाच्या दरम्यान खाद्य पाहिजे असते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने वजन वाढवून आरामही पाहिजे असतो. यासाठी काही दिवस ते थांबा घेतात. याला ‘फिडिंग अ‍ॅण्ड रेस्टिंग स्टॉप’ असेही म्हणतात. हा पक्षी साधारण मे महिन्यापर्यंत आपला पाहुणचार उपभोगतो. चिमण्यांपेक्षा काहीशा मोठ्या आकाराचे हे पक्षी थव्याने आकाशात विहार करतात. एका थव्यात दीड हजार ते दोन हजार पक्षी असतात.(प्रतिनिधी)