शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतली स्वराज्य  स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 13:04 IST

Nagpur News ही  घटना ४ जुलै १७७६ ची नसून  ह्या  २० फेब्रुवारी २०२१ ची आहे आणि तीही  कनेक्टिकट मधील मराठी माणसांनी घडवून आणली .  शिवजयंती च्या निमित्ताने आयोजलेल्या नाट्यमाध्यमातून. 

नागपूर : ही  घटना ४ जुलै १७७६ ची नसून  ह्या  २० फेब्रुवारी २०२१ ची आहे आणि तीही  कनेक्टिकट मधील मराठी माणसांनी घडवून आणली .  शिवजयंती च्या निमित्ताने आयोजलेल्या नाट्यमाध्यमातून. 

करोना मुळे थोडे नैराश्याचे आणि  आर्थिक मंदीचे वातावरण होते गेले वर्षभर . काळरात्र जरी नसली तरी अंधाराची  छाया  आणि अनिश्चितता दाटून आली होती . मग उभारी घेऊन  गरुडझेप  घेण्यासाठी आपण काय करावे ?  आपल्या इतिहासात अशक्य गोष्टी करण्याची प्रेरणा तीन अक्षरात दडून बसली आहे. नुसते शिवाजी महाराज म्हणले की मनगटा मध्ये जोर येतो आणि कुठल्याही संकटाशी सामना करायचे बळ येते. इथे तर कनेक्टिकट मधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट ) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM ) चमूने  अक्खे शिवचरित्र नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले तेही ३५ मिनिटात. शिवजन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या राज्याभिषेक सोहोळ्या पर्यंत सर्व घटनांचा समावेश असलेला बहुमाध्यमिक म्हणजे नाच, पोवाडे, नाट्य , देशी खेळ समाविष्ट असलेले फिरोदिया करंडकाच्या स्वरूपात केलेला कलाविष्कार प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. करोना  काळातली सगळी बंधने आणि काळजी घेऊन आयोजित केलेला हा  कार्यक्रम  न्यू जर्सी मध्ये  मल्लखांब फेडेरेशन USA आणि इंडियन कॉन्सुलेट नी  शिवजयंती निमित्त आयोजित केला होता . 

ह्या शिवसोहळ्याची सुरवात साधारण २० जानेवारी च्या आसपास झाली. इतक्या छोट्या वेळात आणि  सद्य परिस्थिती च्या मर्यादां मध्ये उभी  राहिलेली ही  कलाकृती  हे एक आश्चर्य म्हणण्या सारखे आहे.  केवळ ३  पूर्ण तालमी आणि  दर दिवशी केलेले झूम आणि व्हाटस अँप कॉल्स ह्याने हे नाटक उभे राहिले   म्हणतात ना शिवाजी  ही  तीन अक्षरे  सामान्य   माणसाला अद्वितीय गोष्टी करण्याचे सामर्थ्य देतात. उत्कृष्ट 'टीमवर्क' म्हणजे सांघिक कामगिरी  ज्याला  म्हणता येईल ह्याचे एक उदाहरण  . मल्लखांब  संघटनेशी  संलग्न असलेले श्री उपेंद्र वाटवे ह्यांनी  ह्या प्रस्तावित कार्यक्रमाची कल्पना DARHCT च्या टीमला दिली साधारण पणे  २० जानेवारी सुमारास. संकल्पना आणि संहिता लिहिण्याचे काम गौतम नाईक आणि प्राजक्ता दीक्षित यांनी सुरु केले. संयोजनामध्ये दुर्गेश जोशी , किरण परांजपे आणि मुकुंद अवटी यांनी  मुख्य हातभार लावला. पार्श्वसंगीत आणि पोवाड्याचा भार अनुप्रिया कायंदे आणि प्रसाद दीक्षित यांनी सांभाळला. नृत्य दिग्दर्शन मोहना जोग आणि सीमा वाटवे यांनी केले. देशी खेळ आणि लेझीम याचे आयोजन वैदेही परांजपे यांनी केले.  रंगभूषा, कला, वेशभूषा  ह्या  महत्वाच्या बाबी ज्याने ह्या नाटकाला  दृश्य परिणामकता  दिली , त्या बाबी कीर्ती मोरे, उपेंद्र आणि सीमा वाटवे , दीपाली अवटी  यांनी समर्थ पणे  सांभाळल्या . बॅकस्टेज साठी योगेंद्र जोग आणि संतोष कायंदे यांनी मदत केली. स्वरा  कायंदे हिने केलेला बालशिवाजीची भूमिका लक्षणीय ठरली. 

 फिरोदिया स्वरूप ही  मूळ संकल्पना होती त्यामुळे संहितेत नाटक भाग हा जिजाऊंनी शिवबांना कसे घडवले  ह्यावर  आधारित  दिला.  लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्राजक्ता दीक्षित आणि गौतम नाईक यांनी सांभाळली  सद्य परिस्थिती तुलना एक शाहीर ( मुकुंद अवटी )आणि सामान्य माणूस (प्रसाद दीक्षित)   करतात आणि शिवचरित्रातून स्फूर्ती घेतात. शिवजन्मानन्तरचा पाळणा नृत्य स्वरूपात प्रस्तुत झाला. सर्व स्त्री कलाकारांनी यात उत्साहानी सहभाग घेतला.  जिजाऊंची भूमिका प्राजक्ता दीक्षित यांनी सुंदर रित्या पार पाडली.   ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला अश्या शून्यातून, स्वराज्य निर्माण करण्या ची प्रेरणा जिजाऊंनी कशी दिली. सोन्याचा नांगर (यात किरण परांजपे यांनी पंतांची भूमिका केली), स्वराज्याची संकल्पना , जिजाऊ महाराजांच्या आयुष्याची माहिती , रांझेकर पाटलाचा निवाडा , सवंगड्याची साथ, देशी खेळ आणि लेझीम  आणि रायरेश्वरसमोरची शप्थ  हे सगळे प्रवेश सुंदर रंगले. बाल चमू चा लक्षणीय सहभाग होता. स्वरा कायंदे यांनी बालशिवाजीची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली.   तन्वी आणि तेजस परांजपे, मैथिली अवटी, रुशील  आणि रिशान जोग, श्रीहरी कायंदे आणि आद्या  दीक्षित ह्या  बाल चमू ने मजा आणली. मावळे झालेले उपेंद्र वाटवे आणि दुर्गेश जोशी यांना बॅक स्टेज साठी संतोष कायंदे आणि योगेंद्र जोग यांनी मदत केली.  अफझल वध आणि पावनखिंडी ची लढाई  हे प्रवेश पोवाड्याच्या स्वरूपात प्रस्तुत झाले . ढोलकी वर प्रसाद दीक्षित , पेटीवर अनुप्रिया कायंदे, मुकुंद अवटी  यांनी धरलेली टाळ  आणि त्यांना सुरात स्वतः अनुप्रिया कायंदे , सीमा वाटवे  , अश्विनी आणि दुर्गेश जोशी  यांनी दिलेली साथ  ह्यामुळे  उपस्थित मंत्रमुग्ध  झाले.  नंतर शाहिस्तेखानाला दिलेली शिकस्त ,आग्र्याहून सुटका निवेदनातून सांगितले गेल्यावर शिवराज्याभिषेकाचा  सोहोळा ढोल ताशाच्या गजरात आणि नृत्यातून प्रस्तुत झाला आणि स्वराज्याची स्थापनेचा जयघोष न्यू जर्सी  मध्ये दुमदुमला . प्रेक्षकानी धरलेला ठेका आणि जयजयकाराने वातावरण पूर्ण भारावून  गेले. 

तिथे जमलेल्या प्रेक्षकांना  ह्या प्रयोगांनी शिवकाळात नेऊन ठेवले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असेलेले भारताचे कॉऊंसेल जनरल श्री रणधीर जैस्वाल यांनी ह्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले.  मल्लखांब फेडेरेशन ऑफ USA  कडून चिन्मय पाटणकर आणि कुटुंबीय, राहुल जोशी  , महेश वाणी आणि नीरज नरगुंड यांनी शिव जयंती निमित्त आयोजित केलेल्या सुरेख कार्यक्रमाला कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आणि खूप सन्माननीयांनी स्वतः किंवा ऑनलाईन उपस्थिती लावली . ह्या कार्यक्रमात न्यू जर्सी येथील मल्लखांब संघानी डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली अमेरिकेतील वादळ आणि स्नो स्टॉर्मला ना जुमानता कनेक्टिकट हुन  २-३ तास प्रवास करून ह्या मावळ्यांनी न्यू जर्सी चा गड  जिंकला आणि उपस्थित आणि लाईव्ह  वेबकास्टिंगद्वारा बघणाऱ्या प्रेक्षकांची मने सुद्धा!!- गौतम नाईक

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज