नागपूर - एकट्या राहत असलेल्या स्त्रियांचा सपोर्ट ग्रुप म्हणून तयार झालेल्या डियर वन्स फाऊंडेशनच्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी प्रेस क्लब येथे झालेल्या सभेत या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आयुष्यात जोडीदार नसणे ही स्थिती बऱ्याच जणाच्या वाट्याला येते. अशा जोडीदार नसलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांना, समस्यांना समजावून घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी कांचन गेहानी, उपाध्यक्षपदी स्वाती खंडेलवाल, सचिव वर्षा बाशू, कोषाध्यक्ष अर्चना चांदले, संघटन सचिव सोनल इसळ, सहसचिव सरिता कांबळे व सोनिया यादव, तर सदस्यपदी नीता वाघमारे, विदुला मुठे, सुरेखा रडके, कविता गेहानी व निधी जैन यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी देवयानी पोहेकर यांनी सदस्यांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
‘डियर वन्स फाऊंडेशनच्या कार्यकारिणीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST