शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

वैद्यकीय उपकरणे, खरेदीसाठी समिती स्थापन

By admin | Updated: March 3, 2017 02:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उपकरणांसह अन्य विविध प्रकारची खरेदी करण्याकरिता माजी पोलीस

शासनाची हायकोर्टात माहिती : अधिष्ठात्यांचा समावेश करण्याचे निर्देशनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उपकरणांसह अन्य विविध प्रकारची खरेदी करण्याकरिता माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.खरेदी समितीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने समितीमध्ये अधिष्ठाता किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचे निर्देश शासनाला दिलेत. विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)ने विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजूर केलेला निधी खर्चाअभावी परत जाणार होता. न्यायालयाच्या दणक्यानंतर शासनाने निधी परत जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षात नागपुरातील मेयो व मेडिकलसह यवतमाळ व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना प्रत्येकी ३ कोटी रुपये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ५ कोटी तर, दंत महाविद्यालयाला १.१ कोटी रुपये मंजूर आहेत. याप्रकरणात अ‍ॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत. निधी परत जाणार असल्याचा मुद्दा त्यांनीच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. याप्रकरणावर आता २३ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.