शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ निमगडे हत्याकांडामध्ये विशेष तपास पथक स्थापन करा; मुलाची हायकोर्टाला मागणी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 26, 2023 19:05 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे.

राकेश घानोडेनागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. तसेच, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने या हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही, असा आरोपही केला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व भारत देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सीबीआयने न्यायालयाच्या निर्देशानुसार, हत्याकांडाच्या तपासाचा सर्वसमावेशक अहवाल सादर केला व सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याकरिता आवश्यक पुरावे आढळून आले नाही, अशी माहिती दिली. तसेच, प्रकरणाची फाईल बंद करण्याची परवानगी मागितली. त्यावर अनुपम निमगडे यांनी आक्षेप घेतला. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हत्याकांडाचा पर्दाफाश झाल्याचे सांगितले होते आणि गुन्हेगारांची नावेही जाहीर केली होती. परिणामी, सीबीआयने योग्य पद्धतीने तपास केला नाही, हे दिसून येते. करिता, तपासाकरिता विशेष पथक स्थापन करणे आवश्यक आहे, असे निमगडे यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर उन्हाळी सुट्यांनंतर (येत्या जूनमध्ये) पुढील सुनावणी निर्धारित केली.

२०१६ मध्ये घडली होती घटनाही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदूकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय