विभागीय आढावा बैठक : बार्टी महासंचालक राजेश ढाबरेनागपूर : बार्टीच्यावतीने समतादूत म्हणून कार्य करताना समतादूतांनी समाजात सामाजिक सौहार्द कायम राहावे, यासाठी सातत्याने विविध सांस्कृतिक कलाविषयक व सामाजिक समता कार्यक्रमांचे आयोजन करून प्रयत्नरत राहावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे येथील महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महासंचालकांनी नागपूर विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टी पुणेचे समतादूत प्रकल्पाचे मुख्य संचालक डॉ. वसंत रामटेके, जात पडताळणी समिती क्र.३ चे सदस्य तथा उपायुक्त आर.डी.आत्राम, जात पडताळणी समिती क्र.३ चे सदस्य-सचिव राजेश पांडे, नागपूर विभागाच्या समतादूत प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.महासंचालक राजेश ढाबरे यांनी यावेळी समतादूत प्रकल्प, कौशल्य विकास कार्यक्रम, यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षा तसेच जी.आर.ई. व टोफेल परीक्षांचे आयोजन तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन बँकिंग लिपिक व रेल्वे स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था व अशासकीय संस्थांच्या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.येत्या २०१६-१७ मध्ये बार्टीच्या वतीने राबवावयाच्या विविध प्रकल्पाबाबत त्यांनी सकारात्मक धोरण राबविण्याचे संकेत दिले. यावेळी त्यांचे समवेत देवकर, संशोधन अधिकारी प्रशांत तांबे, सहायक प्रकल्प अधिकारी माधुरी सरोदे, मोहम्मद अझरुद्दीन, तुषार वानखेडे, सहायक प्रकल्प संचालक नेहा ठोंबरे, प्रकल्प समन्वयक प्रियंका अभारे, प्रकल्प सहयोगी हितेश चव्हाण, समतादूत प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी अमोल गावनेर, दिनेश पाल, नंदिनी डोहरे, समतादूत प्रकल्पाचे तालुका समन्वयक व विदभार्तील कार्यरत समतादूत उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सामाजिक सौहार्द प्रस्थापित करा
By admin | Updated: May 21, 2016 03:01 IST