शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

लोकल ‘स्पोटर््स अकादमी’ स्थापन करा

By admin | Updated: October 27, 2015 03:43 IST

विविध स्तरातील खेळाडूंना विशेषत: आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि)

नागपूर : विविध स्तरातील खेळाडूंना विशेषत: आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) लोकल स्तरावर स्पोर्ट्स अकादमी स्थापन करावी, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा, कोळसा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.वेकोलितर्फे ‘प्रवाह-पायोनिअरिंग द चेंज’ या कार्यक्रमाचे आयोजन वेकोलिलगतच्या विहार कॉलनी येथील सांस्कृतिक भवनात सोमवारी करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोयल बोलत होते. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सहसचिव एस.के. साही आणि वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यावेळी उपस्थित होते. गोयल म्हणाले, सृष्टी शर्माने देशविदेशात चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी तिला कोल इंडिया आणि वेकोलि सर्वतोपरी मदत करेल. प्रत्येक गावात मुख्यत्वे आदिवासी क्षेत्रात टॅलेंट आहे. बहुतांश अवॉर्ड दक्षिण अफ्रिकन घेऊन जातात. कारण त्यासाठी नैसर्गिक स्थिती अनुकूल असते. अशा स्तराचे प्रशिक्षण युवकांना गावातच मिळावे, यासाठी स्थानिक स्तरावर स्पोर्ट्स अकादमी सुरू करावी. या अकादमीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतील आणि निश्चितच सुवर्ण पदक मिळवितील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. सृष्टीला २.१० लाखांचा धनादेशया समारंभात सृष्टी धर्मेंद्र शर्माचा पीयूष गोयल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २.१० लाखांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नेतृत्वगुण व दूरदृष्टी महत्त्वाची४गोयल म्हणाले, कंपनी सरकारी असो वा खासगी हे महत्त्वाचे नाही, पण तिथे काम करणाऱ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि दूरदृष्टी असावी, हे महत्त्वाचे आहे. हेच गुण ‘प्रवाह’ उपक्रमात जुळलेले युवक-युवती तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वेकोलिचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सृष्टीला ‘लोकमत’चे बळ सृष्टी शर्मा हिच्यातील प्रतिभा ओळखून तिची राष्ट्रीय स्तरावर ओळख करून देण्याचा विडा ‘लोकमत’ने उचलला होता. २३ आॅगस्ट २०१४ रोजी हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सृष्टीने नागरिकांसमोर लोएस्ट लिंबो स्केटिंग ‘ओवर १० मीटर्स’चे यशस्वी प्रदर्शन केले. तिचे हे प्रदर्शन लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्यात आले होते. अखेर २०१५ च्या सुरुवातीला सृष्टीच्या नावाने ‘लोएस्ट लिंबो स्केटिंग १६.५ सेंटीमीटर हाईट ओवर १० मीटर्स’च्या रेकॉर्डची नोंद झाली. सृष्टीने पुन्हा लोकमतच्या सहकार्याने यावर्षी ७ आॅक्टोबरला वर्धमाननगर येथील सेंटर पॉर्इंट शाळेत लोएस्ट लिंबो स्केटिंग ‘ओवर २५ मीटर्स’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. त्यावेळी वेकोलिचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सृष्टीची वेकोलिचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली होती आणि आर्थिक सहकार्याचे आश्वासन दिले होते.