शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
3
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
4
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
5
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
6
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
7
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
8
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
9
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
10
जळगावात महायुतीचा 'फॉम्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
11
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
12
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
13
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
14
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
15
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
16
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
17
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
18
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
19
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
Daily Top 2Weekly Top 5

ईएसआयसीने कंपनी कर्मचाऱ्यांना ७० टक्के वेतन द्यावे; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:26 IST

लॉकडाऊनमुळे कामावर जाणे अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी)ने ७० टक्के वेतन अदा करावे, अशा विनंतीसह भारत कन्टेनर्स व इतर २२ कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाला ‘एम्प्लॉयमेंट इंज्युरी’ घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे कामावर जाणे अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी)ने ७० टक्के वेतन अदा करावे, अशा विनंतीसह भारत कन्टेनर्स व इतर २२ कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.कॉर्पोरेशनने २० एप्रिल २०२० रोजी पत्र जारी करून लॉकडाऊनमुळे कामावर जाणे अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना आजारी गृहीत धरण्यात यावे व त्यांना या काळामध्ये सरासरी दैनिक वेतनाच्या ७० टक्के रक्कम अदा करण्यात यावी असे निर्देश नियोक्ता कंपन्यांना दिले आहेत. तत्पूर्वी याचिकाकर्त्या कंपन्यांनी त्यांचे काम बंद असतानाही कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे पूर्ण वेतन दिले. परंतु, आर्थिक चणचणीमुळे कर्मचाऱ्यांना पुढील वेतन देणे कठीण आहे. करिता, याचिकाकर्त्या कंपन्यांनी ३ मे २०२० रोजी कॉर्पोरेशनला निवेदन सादर करून कोरोना साथरोगाला ‘एम्प्लॉयमेंट इंज्युरी’ घोषित करण्याची आणि एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स अ‍ॅक्ट-१९४८ अंतर्गत येणाऱ्या व लॉकडाऊनमुळे कामावर जाणे अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना २० एप्रिल २०२० रोजीच्या पत्रानुसार सरासरी दैनिक वेतनाच्या ७० टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली. परंतु, कॉर्पोरेशनने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर तातडीने निर्णय घेण्याचे आणि पात्र कर्मचाऱ्यांना ७० टक्के वेतन अदा करण्याचे निर्देश कॉर्पोरेशनला देण्यात यावे. तसेच, कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही म्हणून याचिकाकर्त्यांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असा आदेश राज्य सरकारला देण्यात यावा, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.कॉर्पोरेशनकडे ८४ हजार कोटी रुपये जमाएम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक योगदानाचे ८४ हजार कोटी रुपये जमा आहेत. कॉर्पोरेशनला त्यावर दरवर्षी ५ हजार ८८० कोटी रुपये व्याज मिळते. त्यामुळे कॉर्पोरेशनने सदस्य कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात ७० टक्के वेतन द्यायला पाहिजे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.राज्य सरकार, कॉर्पोरेशनला नोटीसया प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे महासंचालक व राज्य सरकार यांना नोटीस बजावून याचिकेवर ६ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय