शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के औषधांवर कामगार रुग्णालयाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:22 IST

औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व योजनेचे संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यानी ४० टक्के औषधे रुग्णालयात असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात साध्या तापाचे औषधही मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांनी दिली भेट : ‘इएसआयसी’ उठले रुग्णाच्या जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व योजनेचे संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यानी ४० टक्के औषधे रुग्णालयात असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात साध्या तापाचे औषधही मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. परंतु शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न पडला आहे. रुग्णालात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. ५० टक्के पदे रिक्त आहेत. पद भरती होत नसल्याने वरिष्ठ डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे एक-एक वॉर्ड बंद होत आहेत. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसºया रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाचे देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये आपली सेवा देणे बंद करीत आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने त्यांचा संताप समोर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर-रुग्णांच्या संबंधामध्ये कटुता आली आहे. ‘लोकमत’ने या समस्यांना घेऊन वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तावर विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला घेऊन आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या असल्यातरी याचा तातडीने फायदा रुग्णांना किती होणार हा प्रश्न आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधं